व्हिएन्ना : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी हे रविवारी येथे आले असून, इराणमधील अण्वस्त्राविषयी पी ५व एक अशा सहा देशांबरोबर इराणच्या चाललेल्या वाटाघाटीत ते सहभागी होणार आहेत.इराण, अमेरिका, फ्रान्स , जर्मनी , ब्रिटन, रशिया, चीन, या सात देशांच्या वाटाघाटी होतील. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबतचा वाद संपविण्यासाठी २० जुलै ही अंतिम तारीख आहे. वाटाघाटीतील ताठर भूमिका निवळण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत हवी असल्याचे बहुतांश मुत्सद्यांचे मत आहे. केरी रविवारी जर्मनीचे परराष्ट्रमंत्री फ्रँक वॉल्टर स्टीनमियर यांची भेट घेतील. (वृत्तसंस्था)
अमेरिकी परराष्ट्रमंत्री व्हिएन्नात दाखल
By admin | Published: July 14, 2014 12:08 AM