वॉशिंग्टन: कोरोना व्हायरसनं देशभरात मृत्यूचा तांडव चालवला आहे. या जीवघेण्या व्हायरसनं आतापर्यंत 13 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारतातही या जीवघेण्या रोगानं 7 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीला या कोरोना सर्वाधिक फटका बसला असून, त्या देशात दिवसाला जवळपास 500 ते 800 लोक मृत्युमुखी पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अमेरिका आता पुढे सरसावला आहे. अमेरिकेनं हा जीवघेण्या आजार तात्काळ ओळखण्यासाठी तोडगा काढला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाने कोरोना व्हायरसच्या निदान चाचणीला मान्यता दिली आहे. संशयित रुग्ण हा कोरोना संक्रमित आहे की नाही, याबद्दल फक्त 45 मिनिटांतच माहिती मिळणार आहे. सध्या या व्हायरसच्या तपासणीस बराच वेळ लागतो आहे. कोरोनाग्रस्ताला ओळखण्याचं हे तंत्रज्ञान विकसित करणार्या कॅलिफोर्नियामधील आण्विक डायग्नोस्टिक्स कंपनीचे सेफेड म्हणाले की, शनिवारी एफडीएने या चाचणीसाठी मंजुरी दिली आहे. आता याचा वापर रुग्णालये आणि आपत्कालीन सेवांमध्ये केला जाईल. पुढील आठवड्यात शिपिंगद्वारे हे तंत्रज्ञान इतर राज्यांत पोहोचवण्याची कंपनीची योजना आहे.एफडीएने स्वतंत्र मंजुरी देत यासंदर्भात एक निवेदन दिलं आहे. निवेदनात या तंत्रज्ञानाला मान्यता देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. निवेदनात म्हटले आहे की, 30 मार्चपर्यंत कंपनीला त्याच्या चाचणीची उपलब्धता सगळीकडे करून द्यायची आहे. सध्याची चाचणी सरकारी आदेशानुसार असेल आणि नमुने एका केंद्रीकृत प्रयोगशाळेत पाठविण्याचे सुनिश्चित केले गेले आहे, तेथून त्याचा अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे."आरोग्य आणि मानवी सेवा प्रधान करणारे सचिव अॅलेक्स अझर यांनी शनिवारी सांगितले की," आम्ही सावधानता आणि काळजी सारखे निदान करून उपकरणांबरोबर नव्या दिशेकडे वळतो आहोत. जिथे अमेरिकन लोकांना त्वरित तपासणी उपलब्ध होईल. " 'अनेक वैद्यकीय तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, विलंब आणि अनागोंदीमुळे लोकांचे आयुष्यावरचं संकट वाढत चाललं आहे. शक्यतो डॉक्टर आणि परिचारिकादेखील यानं प्रभावित होत आहेत. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे जवळजवळ 80 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रविवारी पहाटेपर्यंत देशभरात कोविड -19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 396वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक वाईट प्रभाव हा महाराष्ट्रावर पडला आहे. देशातील 22 राज्ये कोरोनामुळे बाधित झाली आहेत.भारतीय रेल्वेने 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कोलकाता, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सोमवारपासून मेट्रो चालणार नाही. कोरोना विषाणूमुळे भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या सर्व उपनगरी गाड्या आज रात्री ते 31 मार्च दरम्यान बंद राहतील.
coronavirus : फक्त 45 मिनिटांत होणार कोरोनाग्रस्ताची ओळख; 'या' देशाला मिळालं यश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 8:56 AM
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अमेरिका आता पुढे सरसावला आहे. अमेरिकेनं हा जीवघेण्या आजार तात्काळ ओळखण्यासाठी तोडगा काढला आहे.
ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं देशभरात मृत्यूचा तांडव चालवला आहे. या जीवघेण्या व्हायरसनं आतापर्यंत 13 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे.भारतातही या जीवघेण्या रोगानं 7 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीला या कोरोना सर्वाधिक फटका बसला असून, त्या देशात दिवसाला जवळपास 500 ते 800 लोक मृत्युमुखी पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अमेरिका आता पुढे सरसावला आहे.