शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

अमेरिकेने रोखली पाकची लष्करी मदत

By admin | Published: May 25, 2016 1:31 AM

दहशतवादी हक्कानी गटाविरुद्ध पाकिस्तान स्पष्ट अशी पावले उचलत आहे हे अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसला प्रमाणपत्रासह पटवून देईपर्यंत अमेरिकेकडून पाकिस्तानला ३०० दशलक्ष

वॉशिंग्टन : दहशतवादी हक्कानी गटाविरुद्ध पाकिस्तान स्पष्ट अशी पावले उचलत आहे हे अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसला प्रमाणपत्रासह पटवून देईपर्यंत अमेरिकेकडून पाकिस्तानला ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची लष्करी मदत अडवून ठेवणारा कायदा सिनेटच्या समितीने संमत केला आहे. गेल्या आठवड्यात नॅशनल डिफेन्स अ‍ॅथॉरायझेशन अ‍ॅक्ट (एनडीएए) २०१७ या समितीने संमत केला. गेल्या वर्षीही समितीने हक्कानी नेटवर्कवर कारवाईची अट घातली होती. एनडीएए सिनेटसमोर मतदानासाठी येईल त्यावेळी अनेक सिनेटर्स त्यात सुधारणा सुचविण्याची अपेक्षा आहे. सिनेटची एनडीएएबद्दलची भूमिका ही सभागृहाच्या त्याबद्दलच्या भूमिकेपेक्षा (पाकिस्तानसह अनेक मुद्द्यांवर) वेगळी आहे. सभागृहाने गेल्या आठवड्यात संमत केलेल्या विधेयकाने पाकला अमेरिकेकडून मिळणाऱ्या ९०० दशलक्ष डॉलरच्या मदतीपैकी ४५० दशलक्ष डॉलर रोखून धरले आहेत. तर सिनेटने या दोन्ही रकमा अनुक्रमे ३०० आणि ८०० दशलक्ष डॉलरपर्यंत खाली आणल्या आहेत. अर्थात या दोन्ही रकमा पाकला देण्याआधी पाकिस्तान हक्कानी नेटवर्कविरोधात स्पष्ट अशी उपाययोजना करीत आहे, असे प्रमाणपत्र संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसला देणे आवश्यक आहे. एनडीएए २०१६ ची मुदत येत्या ३० सप्टेंबरमध्ये संपत आहे. पाकला ३०० दशलक्ष डॉलरची मदत खुली करायची असल्यास हक्कानी नेटवर्कविरोधात उपाय करीत आहे, असे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. संरक्षणमंत्र्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे पेटाँगॉनच्या प्रवक्याने सांगितले.