अमेरिकेच्या (America) माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटनच्या सहकारी हुमा आबदीनने (Huma Abedin) ने एक खळबळजनक खुलासा केला आहे. हुमाने सांगितल की, एका खासदाराने विना परवानदगी तिला 'किस'(Forced Kiss) केलं होतं. हुमा आबदीनने एक पुस्तक लिहिलं आहे, ज्यात तिने त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख केलाय. पण तिने त्या अमेरिकन खासदाराचं नाव जाहीर केलं नाही. पण म्हणाला की, या घटनेनंतर त्या घाबरली होती.
'गार्डियन'च्या रिपोर्टनुसार, हुमा आबदीनने Both/And: A Life in Many Worlds नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. ज्यात तिने एका अमेरिकन खासदाराचा कारनामा सांगितला. खासदाराच्या या व्यवहाराने तिला धक्का बसला होता. कारण हुमाला त्या खासदारासोबत असहज वाटत होतं. घटनेनंतर हुमा लगेच खासदाराच्या घरातून निघून गेली. ही घटना २००० सालातील आहे.
हिलरी यांच्या जवळची आहे हुमा
डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार राहिलेल्या हिलरी क्लिंटन हुमावर इतका विश्वास ठेवायच्या की, एकदा त्यांनी हुमाला आपली दुसरी मुलगीही म्हटलं होतं. ४५ वर्षीय हुमाने एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्येही त्या घटनेचा उल्लेख केला. तिने सांगितलं की, 'फारच हैराण करणाऱ्या अंदाजात खासदाराने मला किस केलं होतं. मला फार अवघडल्यासारखं झालं होतं. मला नव्हतं माहीत की, अशा घटनेला कसं हॅंडल करतात'.
हिलरी क्लिंटनची सहकारी हुमा म्हणाली की, 'मी त्या घटनेला मागे सोडलं. त्यावेळी मला नाही वाटलं की, मी लैंगिक अत्याचाराची एक पीडिता बनली आहे. घटनेनंतर खासदाराने अनेकवेळा माफीही मागितली आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, मी ठीक आहे. नंतर आमचं नातं पुन्हा ठीक झालं' .