नवी दिल्ली : भारताच्या दणक्यानंतर चिनी अॅप Tiktok, We Chat ला आता अमेरिकेनेही जोरदार धक्का दिला आहे. रविवारपासून टिकटॉक (Tiktok banned in America) आणि वी चॅट अॅपवर बंदी आदेश काढण्यात आले आहेत. याचा अर्थ रविवारपासून ही अॅप अमेरिकेतही डाऊनलोड किंवा अपडेट करता येणार नाहीत. टिकटॉकचे अमेरिकेत 10 कोटी वापरकर्ते आहेत.
TikTok चे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा; अमेरिकेचा मोठा दबाव
अमेरिकेचे कॉमर्स डिपार्टमेंटने शुक्रवारी आदेश काढले आहेत. यानुसार रविवारी 20 सप्टेंबरपासून अमेरिकेत चिनी मोबाईल अॅप टिकटॉक आणि वी चॅट डाऊनलोड करता येणार नाही. महत्वाचे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा आदेश रविवारपर्यंत मागेही घेण्याची शक्यता आहे. कारण टिकटॉकची कंपनी बाईट डान्स अमेरिकेच्या सरकारसोबत तेथीलच कंपन्यांना टिकटॉक विकण्याबाबत बोलत आहेत. यावर सरकारही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
चीनला तगडा झटका! PUBG, TikTok बॅनमुळे तब्बल 1.46 लाख कोटी बुडाले
याबाबत ट्रम्प यांनीच सांगितले होते. टिकटॉकबाबत निर्णय घेण्यासाठी वॉलमार्ट आणि ओरॅकलच्या प्रतिनिधींशी चर्चा करत असल्याचे म्हटले होते. गेल्या महिन्यातच ट्रम्प यांनी या अॅपवर बंधने आणण्यासाठी आदेशावर सह्या केल्या होत्या. यामध्ये या अॅपच्या कंपन्या अमेरिकेतील व्यवसाय स्थानिक कंपन्य़ांना देऊ शकतात असे म्हटले होते. यावेळी मायक्रोसॉफ्ट टिकटॉकसोबत चर्चा करत होता, असे सांगितले जात होते.
विधानसभा अधिवेशनानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह