वॉशिंग्टन : भारतामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अमेरिका हस्तक्षेप करीत असल्याच्या रशियाने केलेल्या आरोपाचा अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने इन्कार केला आहे. त्या देशाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, “भारताच्याच नव्हेतर, जगातील कोणत्याही देशाच्या निवडणुकांमध्ये अमेरिका ढवळाढवळ करीत नाही.” तर “भारतातील लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही राजवटींपैकी एक आहे. २१व्या शतकामध्ये भारताचे अमेरिकेशी संबंध आणखी दृढ होतील,” असे अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी सांगितले.
अमेरिकेपेक्षा उत्तम भारतातर्सेटी म्हणाले की, भारतामध्ये निष्पक्ष वातावरणात निवडणुका होतात. दहा वर्षांनी भारत हे अधिक समृद्ध लोकशाही राष्ट्र म्हणून पुढे येणार आहे. अमेरिकेपेक्षा भारतामध्ये काही गोष्टी उत्तम आहेत.
भारतीय सक्षमअमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, “कोणाला सत्तेवर निवडून द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता सक्षम आहे. त्यामुळे त्या देशाच्या निवडणुकांत हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
नेमका काय केला होता आरोप?रशियाच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी म्हटले होते की, “अमेरिका भारताविरोधात खोटेनाटे आरोप करीत असते. केवळ भारताविरोधातच नव्हेतर, अनेक देशांविरोधात अमेरिकेकडून अपप्रचार सुरू असतो. भारताचे ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रीय विचारसरणी यांचा अमेरिकेकडून मान ठेवला जात नाही,” असे झाखारोव्हा म्हणाल्या होत्या. पन्नू याच्या हत्येच्या प्रयत्नात रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्याचा हात होता,’ असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला होता.