अमेरिकेतील (US) नॉर्थ कॅरोलिनामधून (North Carolina) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे Dontae Sharpe नावाच्या तरूणाला १९९४ मध्ये एका हत्येप्रकरणात दोषी मानन्यात आलं आणि त्याला २४ वर्ष इतका काळ तुरूंगात घालवाला लागला. याप्रकरणाचं सत्य जेव्हा जगासमोर आलं तेव्हा कोर्टाने त्याला निर्दोष मुक्त केलं. पण त्याच्या आयुष्यातील २४ वर्ष तुरूंगात निघून गेली.
कोर्टाने मान्य केली चूक
आरोपीला १९९५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. डॉन्टे नेहमी हेच सांगत होता की, त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. मात्र, त्याच्या विरोधात पुरावा असल्याने कोर्टाने त्याला कठोर शिक्षा सुनावली. पण २०१९ मध्ये एका दुसऱ्या कोर्टाने हे मान्य केलं की, त्याला चुकीच्या पद्धतीने कैद करण्यात आलं होतं. गेल्या शुक्रवारी त्याला निर्दोष सोडण्यात आलं आणि कोर्टाने आपली चूक मान्य केली.
independent मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, याप्रकरणात पीडित तरूणावर आरोप लावणाऱ्या महिलेनेही याप्रकरणात खोटी साक्ष दिल्याचं कबूल केलं होतं. ज्यानंतर डॉन्टेला निर्दोष सोडण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
ड्रग्सवरून झाला होता वाद
याप्रकरणी चार्लीन जॉन्सन नावाच्या एका तरूणीने खोटी साक्ष दिल्याने डॉन्टेला अटक करण्यात आली होती. तेच नुकतंच चार्लीनला सायकॅट्रिक वार्डातून सोडण्यात आलं आहे. चार्लीनने साक्ष दिली होती की, तिने एप्रिल १९९४ मध्ये डॉन्टे आणि त्याच्यासोबत एका व्यक्तीला रॅडक्लिफ नावाच्या व्यक्तीची हत्या करताना पाहिलं होतं.
त्यांच्यात ड्रग्सच्या सौद्यावरून वाद झाला होता. डॉन्टे त्यावेळी ड्रग डिलिव्हरी केसमध्ये पोलिसांच्या रडारवर होता. पण मर्डर केसमध्ये साक्षीदाराच्या खोट्या साक्षीमुळे त्याला पोलिसांनी लगेच अटक केली.
तुरूंगातून बाहेर आल्यावर डॉन्टेने अनेक मीडिया हाऊसला मुलाखतीत सांगितलं की, त्याची झोप उडाली आहे. तो अनेक दिवसांपासून झोपू शकत नाहीये. त्याला विश्वास बसत नाहीये की, तो तुरूंगातून बाहेर आलाय. तो फार आनंदीही आहे आणि दु:खीही आहे. कारण त्याच्या आयुष्यातील मोठा काळ तुरूंगात गेला. त्याने सरकारवर केस करणे आणि पाच कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई मागण्याची निश्चय केलाय.