मनिला- अमेरिकन नौदलाचे विमान फिलिपाईन्स समुद्रात कोसळले आहे. या विमानातील 8 जणांना वाचविण्यात यश आल्याचे अमेरिकन नौदलाने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे. सी2-ए ग्रेहाऊंड हे विमान कर्मचारी आणि प्रवासी अशा 11 लोकांसह जपानजवळ ओकिनावाच्या आग्नेयेस स्थानिक वेळेनुसार दुपारी पावणे तीन वाजता कोसळले.
नौदलाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर सुरु केलेल्या शोधमोहिमेत 8 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या सर्व लोकांना यूएसएस रोनल्ड रेगन (सीव्हीएन 76) या नौकेवर पाठलिण्यात आले असे असून त्यांच्या वैद्यकीय चाचणीनंतर ते चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून आले आहे. उर्वरित 3 जणांचा शोध सुरु आहे. अमेरिकन नौदल आणि जपान मेरिटाईम सेल्फडिफेन्स फोर्सच्या जहाजांच्या व विमानांच्या मदतीने हे काम चालू आहे. ही घटना ओकिनावाच्या आग्नेयेस 500 नाविक मैल अंतरावर घडली आहे.