अमेरिकेने त्यांचा महत्त्वकांक्षी आणि अत्याधुनिक शस्त्रांचा प्रकल्प बंद केला आहे. हा प्रकल्प अमेरिकेचे नौदल चालवत होती. अमेरिकन नौदलानं या प्रकल्पावर तब्बल ५०० मिलियन डॉलर्स म्हणजे ३६६७ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर आता हा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. या प्रकल्पाचं नाव इलेक्ट्रोमॅग्नटिक रेलगन डेवलपमेंट प्रोग्राम असं आहे आणि या शस्त्राचं नाव रेलगन(Railgun) असं आहे.
रेलगनमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॉम्ब निघतो जो त्याच्या निशाण्यावर असलेल्याला उद्ध्वस्त करतो. अमेरिकेने नौदलाच्या २०२२ बजेटमधून रेलगन प्रकल्पाचं फंडिंग बंद केले आहे. नौदलाची तयारी आता हायपरसोनिक शस्त्र बनवण्यासाठी आहे. अमेरिकन नौदल असं शस्त्र बनवू इच्छितं की, ते दूरपर्यंत मारा करू शकेल. जहाज आणि जमिनीवरील टार्गेट मिनिटांत संपवेल.रेलगन प्रकल्प आता फक्त ट्रायल बेसिकवर सुरू होता. याला कोणत्याही नौदलाच्या जहाजावर तैनात करण्यात आलं नव्हतं.
रेलगन सर्वसामान्य तोफांपेक्षा वेगळी आहे. इतर तोफांमध्ये बॅरलमधून स्फोटकं आगीच्या संपर्कात येऊन गोळा निघून जातो. परंतु रेलगनमध्ये स्फोटकांऐवजी इलेक्ट्रिसिटी आणि चुंबकीय शक्तीचा उपयोग केला जातो. स्फोटकं नाहीत परंतु या दोन्ही शक्ती एकत्र आल्याने गोळा अनेक पटीने वेगाने जातो. परंतु अमेरिकन नौदलानं हा प्रकल्प बंद का केला त्याबाबत खुलासा केला नाही. रेलगन ही पारंपारीक तोफांपेक्षा जास्त सुरक्षित आहे. स्फोटकांचे वापर नसल्याने जहाजात वजन कमी होतं. त्याऐवजी जास्त गोळे ठेवले जातात. अमेरिकन नौदल या तोफांसाठी सरकारकडे बजेट मागत होती. त्यावर वारंवार चाचणी केली जात होती. २००५ मध्ये या प्रकल्पाची सुरूवात झाली.
सध्या अमेरिकन नौदलाकडे ३ युद्धनौका आहेत ज्यावर रेलगन लावली जाऊ शकते. २०२० मध्ये याची तयारी होणार होती. परंतु कोरोना व्हायरसमुळे काम झालं नाही. अमेरिकन नौदल चीन आणि रशियाच्या स्पर्धेत उतरलं आहे. रेलगनमधून मारा केलेला गोळा ८० ते १६० किमीपर्यंत जातो. ही रेंज कमी असली तरी गती जास्त होती. आता अमेरिका त्यांच्या युद्धनौकांवर बॅलेस्टिक मिसाईल तैनात करणार आहे. जी चीनच्या DF21D मिसाईलचा सामना करू शकेल. रेलगनकडे विमान, मिसाईल आणि ड्रोनला मारण्याची क्षमता होती. परंतु नौदलाने रेलगनऐवजी पारंपारिक मिसाईल आणि तोफांना निवडणं योग्य मानलं.
काही तज्त्रांच्या मते, रेलगन हायपरसोनिक शस्त्रांच्या पुढे अपयशी ठरलं आहे. अमेरिकेने हायपरसोनिक नावाचं असं शस्त्र बनवलं आहे. ज्याची गती २०९९१ किमी प्रति तास आहे. त्याची रेंज २७३५ किमी इतकी आहे. म्हणजे रेंजमध्ये येणाऱ्या कोणत्याही वस्तूला अवघ्या काही सेकंदात नष्ट करू शकेल. अमेरिकन नौदलाने मे महिन्यात याची घोषणा केली होती. हे शस्त्र लावल्यानंतर १५५ मिमीच्या अत्याधुनिक तोफा हटवाव्या लागतील. हायपरसोनिक शस्त्राचा हल्ला वेगाने लक्ष्य भेदणारा आहे. त्याचसोबत ते स्वत: टार्गेट निश्चित करतं दुसरीकडे काही तज्त्र सांगतात चीनमध्ये रेलगन प्रकल्प बंद केला जाणार नाही कारण आता पीपुल्स लिबरेशन आर्मी रेलगनला महत्त्व देत आहे.