२००४ मध्ये स्वदेश हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेता शाहरूख खाननं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट आणि यातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली होती. यातील 'ये जो देश है तेरा...' हे गाणं मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. दरम्यान, अमेरिकन नौदलाच्या काही कर्मचाऱ्यांनी आपल्या अतिशय सुंदररित्या हे गाणं सादर केलं. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्याही हे गाणं पसंतीस उतरत आहे. २७ मार्च रोजी आयोजित एका भोजन कार्यक्रमादरम्यान हे गाणं सादर करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे चीफ ऑफ नेव्हल ऑपरेशन्स मायकल एम गिल्डे आणि भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू उपस्थित होते. तरनजीत सिंग संधू यांनी आपल्या ट्विटर आकाऊंवरन हा व्हिडीओ शेअर केला आहे. "हे एक मैत्रीचं नातं आहे आणि हे कधी तोडलं जाऊ शकत नाही," असं संधू यांनी म्हटलं आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्वदेश या चित्रपटातील हे गाणं असू ते संगीतकार ए.आर.रेहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे.
जेव्हा US Navy म्हणते, 'ये जो देश है तेरा... स्वदेस है मेरा...'; गाण्याची Social Media वर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 8:59 AM
भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला व्हिडीओ
ठळक मुद्देभारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला व्हिडीओअनेक नेटकऱ्यांची व्हिडीओला पसंती