वाशिंग्टन - एकटी अमेरिका जागतिक आव्हानांचा सामना करू शकत नाही. यासाठी भारताची साथ अत्यंत आश्यक आहे. त्यामुळे कुणीही अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष झाले, तरी त्यांच्यासाठी भारताची साथ अत्यंत महत्वाची असेल, असे अमेरिकन परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटले आहे.
मॉर्गन म्हणाले, हे दोन्ही देश संयुक्तपणे एक बलशाली आणि सुरक्षित राष्ट्र आहे. जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी हे दोन्ही देश संयुक्तपणे काम करत आहेत. विशेषतः इंडिया पॅसिफिक भागातील चीनचे प्रभूत्व कमी करण्याच्या दृष्टीने. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, संपूर्ण जग लोकशाही मुल्यांसाठी संघर्ष करत आहे. मॉर्गन म्हणाले, लोकशाही कुठल्याही स्वरुपात परिपूर्ण नाही. मात्र, यात उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेचाही सहभाग आहे.
कुठल्याही राजकीय पक्षाच्या दयेवर भारत-अमेरिका संबंध अवलंबून नाहीत -मॉर्गन म्हणाले, अमेरिका आणि भारत संबंध पूर्वीपेक्षाही बळकट झाले आहेत. तसेच ते भविष्यात अणखी बळकट आणि मधूर होतील. एवढेच नाही, तर या संबंधांच्या पाठीशी कुण्या राजकीय पक्षाचा अथवा एखाद्या व्यक्तीचा हात नाही. आता या दोन्ही देशांतील संबंध राजकीय पक्षाच्या विचारधारेपेक्षाही वरचे आहेत. हे कुठल्याही प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचे असेल. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचा उल्लेख करताना ते म्हणाले, 3 नोव्हेबरला होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रेटिकचा विजय होवो वा रिपब्लिकन पक्षाचा त्यांना भारताशी मधूर संबंध ठेवावेच लागतील. एवढेच नाही, तर अमेरिकन लोकांना माहीत आहे, की अमेरिका आणि भारत एकत्रितपणे अत्यंत मजबूत स्थितीत आहेत. हे दोघेही अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत. एवढेच नाही, तर हे दोन्ही देश एकत्रितपणे अधिक सुरक्षित आहेत, असेही मॉर्गन म्हणाले.
10 वर्षांत जागतिक आव्हानांचा आकडा मोठा असेल -मॉर्गन म्हणाले, पुढील 10 वर्षांत जागतिक आव्हानांचा आकडा फार मोठा असेल हे आम्हाला माहीत आहे. ही आव्हाने आणखी गुंतागुंतीची होतील. अमेरिका आणि भारत एकसारख्या अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. या आव्हानांचा सामना अमेरिका एकट्याने करू शकत नाही. अम्हाला आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे काम करावे लागेल. मॉर्गन म्हणाले, भारताबरोबरचे आमचे जागतिक भागितारी मोठी होत आहे. लोकशाही प्रक्रियेच्या बाबतीत दोन्ही देश मोठे आहेत. भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठे लोकशाही देश आहेत. हे समान मुल्य दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, असेही मॉर्गन म्हणाले.