कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल, डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी आता खूशखबर आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तब्बल 11 पटीने कमी असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात भरती होण्याचा धोका देखील कमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी देशामध्ये एका एक्शन प्लॅनची घोषणा केली असून लसीकरणासंदर्भात काही निर्देश जारी केले आहेत.
अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना रुग्णालयात भरती होण्याची शक्यता ही 10 पटीने कमी झाली आहे. तर मृत्यूचा धोका 11 पटीने कमी झाला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या वतीने तीन नवीन पेपर जारी करण्यात आले आहेत. यामधील एका पेपरमध्ये याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सीडीसीच्या रॉशेल वॉलेंस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसर्चमध्ये लसीकरण काम करत असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेच्या 13 क्षेत्रांमध्ये 4 एप्रिल ते 19 जून दरम्यान लाखो लोकांची तपासणी करण्यात आली.
लसीकरणाच्या नव्या अभियानात सर्वात आधी वयोवृद्ध लोकांना डोस देण्यात येणार आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान 400 हून अधिक रुग्णालयात याबाबत रिसर्च करण्यात आला आहे. यामध्ये लसीकरण महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. लसीकरणाचा चांगला परिणाम होत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. रिसर्चमधून नवनवीन माहिती सातत्याने समोर येत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनातून बरं झाल्यावर किडनीवर परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे. कोणतीही लक्षणं न दिसता किडनी 70 टक्के काम करणं बंद करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. जर्नल ऑफ दी अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (Journal of the American Society of Nephrology) या जर्नलमध्ये या नव्या संशोधनाबद्दलचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे.
बापरे! कोरोनानंतर कोणतीही लक्षणं न दिसता 70 टक्के काम करणं बंद करतेय किडनी; रिपोर्टमधून खुलासा
कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात जावं लागलेल्या किंवा कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणं दिसलेल्या रुग्णांनाही किडनीशी संबंधित समस्या जाणवत असल्याचं दिसून आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कोरोना संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या रुग्णांना या समस्या जाणवत असल्याचं म्हटलं आहे. समस्यांवर लवकर उपचार केले गेले नाहीत, तर किडनीचा गंभीर विकार होऊ शकतो, असा इशाराही रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. किडनी निकामी झाली, तर शरीरातल्या अन्य अवयवांवरही विपरीत परिणाम होतो, असं अनेक विशेषज्ञांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (Washington University) रिसर्चमधून असं दिसून आलं आहे, की किडनी निकामी होण्याची समस्या अशा रुग्णांमध्ये वाढत चालल्याचं दिसून येत आहे. मात्र त्याची लक्षणं दिसून येत नाहीत.