वॉशिंग्टन - अधिकारांचा गैरवापर व संसदेच्या कामात अडथळे या आरोपांवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदच्युत करण्यासाठी महाभियोगाची कारवाई 21 जानेवारीपासून सिनेटमध्ये सुरू झाली. महाभियोगास सामोरे जावे लागणारे ट्रम्प हे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत असल्याने महाभियोगात दोषी ठरून त्यांच्यावर हकालपट्टीची नामुष्की येण्याची शक्यताही कमी होती. त्यानंतर आता महाभियोग खटल्यातून डोनाल्ड ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सिनेटने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळून लावत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. रिपब्लिकन पक्षाने 52-48 च्या अंतराने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून 53-47 मतांनी ट्रम्प यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्षांवर महाभियोगाची कारवाई होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी एंड्रयू जॉनसन आणि बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली होती. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज’कडून आला होता. त्या सभागृहात विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. त्या सभागृहाने ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाचे दोन आरोप निश्चित केले होते.
नेमके काय होते आरोप?
अधिकारांचा व्यक्तिगत व पक्षीय स्वार्थासाठी गैरवापर. यंदा होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांच्या स्पर्धेत स्पर्धक व म्हणूनच ट्रम्प यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असतील. अमेरिकी सरकारने युक्रेनला 391 दशलक्ष डॉलरची मदत मंजूर केली होती; परंतु ट्रम्प यांनी जो बिडेन व त्यांच्या मुलाच्या युक्रेनमधील व्यावसायिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर या काळात युक्रेन सरकारवर दबाव आणून मदतीची रक्कम प्रत्यक्ष अदा करणे रोखले. संसदेच्या कामकाजात अडथळे. ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या तयारीसाठी ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज’ने चौकशी सुरू केली. त्यासाठी सभागृहाने ट्रम्प प्रशासनाकडून काही कागदपत्रांची मागणी करून काही अधिकाऱ्यांना साक्षीसाठी समन्स काढली; परंतु ट्रम्प यांनी ही कागदपत्रे व साक्षीदार रोखून धरले.
अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणावेळी त्यांच्या भाषणाचा कागदच फाडून टाकला आहे. ट्रम्प वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांचे तिसरे 'स्टेट ऑफ द यूनियन अॅड्रेस' भाषण देत होते. नॅन्सी या त्यांच्या पाठीमागेच उभ्या राहून भाषणाचा कागद फाडताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रम्प यांचे भाषण संपल्यानंतर लोक टाळ्या वाजवत होते आणि त्यांच्या पाठीमागे नॅन्सी कागद फाडत होत्या. हे करताना त्यांना ट्रम्प यांनी पाहिले नव्हते. नॅन्सी या व्हाईट हाऊसच्या स्पीकर आहेत. या कृत्याबद्दल नॅन्सी यांना जेव्हा कारण विचारले गेले तेव्हा त्यांनी पत्रकारांना सांगितले की, हाच पर्याय योग्य होता. हे एक खूपच टुकार भाषण होते.
महत्त्वाच्या बातम्या
हिरे उद्योगाला 'कोरोना'चा फटका; 8000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं ही मोदींची घातक चूक - इम्रान खान
'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!
विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले
महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण