सेऊल- दोन आठवड्यांच्या आशिया पॅसिफिक दौऱ्यावर असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे पोहोचले आहेत. उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमाला कसं उत्तर द्यायचं यावर 'तोडगा काढू' असे सूचक ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे.उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये अणूकार्यक्रमामुळे तणाव वाढत आहे. त्यातच किम जोंग उनने केलेल्या अणू चाचण्यांमुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये थेट वादग्रस्त विधानांची देवणघेवाण होऊन हे वातावरण अधिकच तापले आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाचे नागरिक नेहमीच युद्धाच्या तोंडावर उभे असतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर, सेऊलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 1:04 PM
आशिया पॅसिफिक दौऱ्यावर असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे पोहोचले आहेत. उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमाला कसं उत्तर द्यायचं यावर 'तोडगा काढू' असे सूचक ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे.
ठळक मुद्देजपानमध्ये पंतप्रधान शिंजो अबे यांची काल भेट घेतल्यानंतर डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर निघाले आणि त्यांनी आपण दक्षिण कोरियाला जात असून अध्यक्ष मून यांच्याबरोबर बैठकीत चर्चा करणार असल्याचे ट्वीट केले.