भारताचेचीनसोबत सीमेवादवरुन आधीच संघर्ष सुरु असताना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील भारताला झटका देण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे एच-१ बी व्हिसासह सर्व रोजगार व्हिसा निलंबित करू शकतात, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जरनल’ने दिले आहे. त्यामुळे एच-१ बी व्हिसा निलंबित केल्याने भारतीयांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावानूसार, जोपर्यंत निलंबन हटविले जाणार नाही, तोपर्यंत नव्याने एच-१ बी व्हिसा मिळालेल्या कोणाही अमेरिकेबाहेरील व्यक्तीला अमेरिकेत येता येणार नाही. सध्या अमेरिकेत असलेल्या व्हिसाधारकांवर मात्र या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे या वृत्तात म्हटले आहे.
‘वॉल स्ट्रीट जरनल’ने म्हटले आहे की, कोरोना विषाणू महामारीच्या काळात कोणीही आजारी विदेशी नागरिक अमेरिकेत येता कामा नये, यासाठी ट्रम्प प्रशासन सर्व प्रकारचे रोजगार व्हिसा निलंबित करू इच्छित आहे. याशिवाय महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या काळात विदेशी नागरिकांनी अमेरिकेत येऊन नोकऱ्या पटकावल्यास स्थानिक अमेरिकी नागरिकांतील बेरोजगारी आणखी वाढण्याची भीती ट्रम्प प्रशासनाला वाटते.
व्हाइट हाउसचे प्रवक्ते होगन गिडले यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकी श्रमिक आणि रोजगार इच्छुकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ट्रम्प प्रशासन बहुविध पर्यायांचा विचार करीत आहे. तथापि, अजून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
एच-१ बी हा विदेशी नागरिकांत सर्वाधिक लोकप्रिय असलेला अमेरिकी व्हिसा आहे. या व्हिसावर हजारो भारतीय आयटी व्यावसायिक दरवर्षी अमेरिकेत जात असतात. मात्र अमेरिकी नागरिकांनाच प्रथम रोजगार मिळायला हवा, अशी ट्रम्प प्रशासनाची भूमिका आहे. त्याअनुषंगाने व्हिसा निलंबनाच्या निर्णयावर विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारताचे चीनसोबत सीमेवादवरुन आधीच संघर्ष सुरु असताना नेपाळने भारताचे तीन प्रदेश देशाच्या नकाशात घेऊन भारताकडे डोळे वटारले आहेत. तसेच नेपाळसोबत आता चीनने बांग्लादेशला देखील जवळ घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भारताच्या शेजारील राष्ट्राच्या आर्थिक कुटनीतीच्या डावात चीनने बांगलादेशच्या ९७ टक्के उत्पादनावरील टॅक्स हटवण्याची घोषणा चीनने केली आहे. त्यातच आता अमेरिकेने देखील एच-१ बी व्हिसासह सर्व रोजगार व्हिसा निलंबित केल्यास भारताला मोठा झटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार?; भारताच्या आक्रमक भूमिकेवरुन चीननं दिलं मोठं आव्हान
'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध
कौतुकास्पद! वडिलांच्या कष्टाचं चीज; गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार