US President Donald Trump on PM Modi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबतच्या टॅरिफ धोरणचा पुनरुच्चार केला आहे. मात्र यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना'महान मित्र' आणि 'अतिशय हुशार व्यक्ती' असं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापार चर्चेचे सकारात्मक परिणाम होतील, असा विश्वास व्यक्त केला. असं असलं तरी ट्रम्प प्रशासनाकडून भारतीय वस्तूंवर परस्पर शुल्क लादण्याचा दबाव कायम आहे.
व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी भारताबाबतच्या टॅरिफच्या धोरणावर आपल्या भूमिका मांडली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महान मित्र आणि अतिशय हुशार व्यक्ती असे वर्णन केले. त्यामुळे भारताकडे अतिशय अप्रतिम पंतप्रधान आहेत, असं ट्रम्प म्हणाले. यावेळी माझी एकच समस्या आहे की भारत जगातील सर्वात जास्त टॅरिफ असलेल्या देशांपैकी एक आहे असंही ट्रम्प म्हणाले.
"पंतप्रधान मोदी नुकतेच अमेरिकेला आले होते. आम्ही नेहमीपासून खूप चांगले मित्र आहोत. भाभारत हा जगातील सर्वात जास्त टॅरिफ असलेल्या देशांपैकी एक आहे. ते खूप स्मार्ट आहेत. पंतप्रधान मोदी खूप हुशार व्यक्ती आहे आणि माझे चांगला मित्र आहेत. आमच्यात खूप चांगले संभाषण झाले आणि मला वाटते की यामुळे भारत आणि आमच्या देशामध्ये खूप चांगले परिणाम होतील. मला असे म्हणायचे आहे की तुमच्याकडे एक अप्रतिम पंतप्रधान आहेत," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिका २ एप्रिलपासून अनेक देशांवर टॅरिफ लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. ट्रम्प यांनी भारताच्या व्यापार धोरणांवर सातत्याने टीका केली असून देशाला 'टॅरिफ किंग' म्हटलं आहे. "माझे भारतासोबत खूप चांगले संबंध आहेत, पण माझी एकच अडचण आहे की ते जगातील सर्वात जास्त टॅरिफ आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत. मला वाटते की ते कदाचित ते दर मोठ्या प्रमाणात कमी करतील, पण २ एप्रिल रोजी आम्ही त्यांच्यावर तेच शुल्क आकारू जे ते आमच्याकडून आकारतात," असंही ट्रम्प म्हणाले.