अमेरिकेच्या संसदेत गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारामुळे महासत्ता हडबडली आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला अडचणीत आणण्यासाठी कोणत्याही देशांवर अण्वस्त्रांचा हल्ला करू शकतात अशी भीती असतानाचा डेमोक्रेट सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर उद्या मतदान होण्याची शक्यता आहे. या मुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. परंतु एकीकडे ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचार होऊ शकतो, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यानंतर व्हाईट हाऊसनं २४ जानेवारीपर्यंत वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. २० जानेवारी रोजी बायडेन यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आजच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी जाहीर केली. २४ जानेवारीपर्यंत ही आणीबाणी लागू राहणार आहे. दरम्यान, बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचार होऊ शकतो. तसंच ५० राज्यांच्या राजधान्या आणि वॉशिंग्टन डीसी मध्ये शसस्त्र हल्ला करण्याचा कट आखला जात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. त्यानंतर व्हाईट हाऊसनं वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला. कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर एफबीआय आणि अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. यानंतर बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. तसंच सुरक्षा व्यवस्थेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पॅटागॉननं राजधानीमध्ये १५ हजारांहून अधिक नॅशनल गार्ड्स तैनात करण्याची परवानगी दिली आहे.
बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लागू केली आणीबाणी
By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 7:36 PM
२० जानेवारीला पार पडणार आहे बायडेन यांचा शपथविधी सोहळा
ठळक मुद्दे२० जानेवारीला पार पडणार आहे बायडेन यांचा शपथविधी सोहळा बायडेन यांच्या शपथविधीसोहळ्यादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी