शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी अमेरिकेकडून ९०० अब्ज डॉलरचे पॅकेज, बेरोजगारांना  मिळणार भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 1:31 AM

CoronaVirus News in US : लोकप्रतिनिधीगृह असलेल्या ‘काँग्रेस’मध्ये ३५९ विरुद्ध ५३ मतांनी तर वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये ९१ विरुद्ध ७ मतांनी यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.

न्यूयॉर्क : कोविड-१९ साथीचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकी संसदेने ९०० अब्ज डॉलरच्या आपत्कालीन पॅकेजला मंजुरी दिली आहे. या पॅकेजमधून गरजू नागरिकांसह उद्योग व व्यवसायांना आर्थिक मदत आणि बेरोजगारांना केंद्रीय बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. सलग दोन दिवस चर्चा केल्यानंतर अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पॅकेजला मंजुरी दिली. लोकप्रतिनिधीगृह असलेल्या ‘काँग्रेस’मध्ये ३५९ विरुद्ध ५३ मतांनी तर वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये ९१ विरुद्ध ७ मतांनी यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले. हे विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. या पॅकेज अन्वये, छोट्या व्यावसायिकांना २८४ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य दिले जाणार आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर कायम ठेवण्यासाठी या पॅकेजची त्यांना मदत होईल. याशिवाय गरजू अमेरिकी नागरिकांना १६६ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य केले जाईल. यातून गरजू नागरिकांना एकरकमी ६०० डॉलर मिळतील. घरभाडे भरू न शकणाऱ्या नागरिकांना या विधेयकांतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी २५ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. भाडे थकले म्हणून घरमालक भाडेकरूंना घराबाहेर काढू शकणार नाहीत.बेरोजगारांना देण्यात येत असलेल्या ६०० डॉलरच्या केंद्रीय मासिक बेरोजगारी लाभाची मुदत डिसेंबर अखेरीस संपणार आहे. हा भत्ता कमी करून ३०० डॉलर करण्यात आला आहे; मात्र त्याची मुदत मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. अमेरिकी काँग्रेस सभागृहाच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांनी सांगितले की, ‘अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांना कोरोना विषाणूला चिरडण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी उचलण्यात आलेले हे पहिले पाऊल आहे.’सिनेटचे वरिष्ठ सदस्य एम. मॅकॉवेल यांनी सांगितले की, हे पॅकेज अमेरिकी नागरिकांना संकटातून सावरण्यासाठी फायदेशीर ठरेल. अमेरिकेतील छोटे व्यावसायिक, बेरोजगार व गरजू नागरिक यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा होती. त्यांना या पॅकेजने मोठा दिलासा मिळेल.

बाजारपेठेला चालना देण्याचा प्रयत्नया पॅकेजच्या माध्यमातून ग्राहकांची क्रयशक्ती वाढून बाजारपेठेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेन अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर खुंटला आहे. व्यापार-उदिम ठप्प असून, बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून, मृत्यूचा आकडाही मोठा आहे. काेरोनाच्या संकटकाळातच अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. जो बायडेन यांनी ही निवडणूक जिंकली असून, पुढील महिन्यात २० जानेवारी रोजी ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका