नदीच्या खोलात एका स्कूबा डायव्हरला असं काही सापडलं, ज्याचा शोध गेल्या २१ वर्षापासून घेतला जात होता. अमेरिकेतील (America) लोकप्रिय स्कूबा डायव्हिंग (Scuba Diver) चॅनल एक्सप्लोरिंग विद नगच्या जेरेमी साइड्सला पाण्याच्या खाली एक कार सापडली. त्यात दोन लोकांचे मृतदेह होते. जे दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून गायब होते.
पोलिसांच्या हातीही काही लागलं नव्हतं
‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, कारमध्ये सापडलेली डेडबॉडी एरिन फोस्टर आणि जेरेमी बेटेलचे आहेत. त्यांचा अनेक वर्षांपासून शोध घेतला जात होता. यूएसच्या Tennessee मध्ये राहणारं हे कपल ३ एप्रिल २००० ला गायब झालं होतं. पोलिसांनी दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काही यश मिळालं नाही. कुणाला काही समजत नव्हतं की, एरिन आणि जेरेमी कुठे गायब झालेत. आता २१ वर्षांनी त्यांच्या गायब होण्याचं रहस्य उलगडलं.
व्हिडीओ मिळाले भरपूर व्ह्यू
जेरेमी साइड्स यूट्यूबरही आहे आणि त्याला पाण्याखाली दडलेलं रहस्य उलगडण्याची आवड आहे. तो स्कूबा डायविंगचे व्हिडीओ तयार करतो आणि ते आपल्या चॅनलवर शेअर करतो. गेल्या महिन्यात तो Tennessee ला गेल होता आणि तिथेच उतरला जिथे दोघांचे मृतदेह होते. जेव्हा तो नदीच्या खोलात गेला तेव्हा त्याला दिसलं की, एका कार फसलेली आहे आणि त्यात दोन मृतदेह आहेत. त्याने याचा व्हिडीओ बनवला. याला आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
कशी पटली ओळख
साइड्सने नदीत कार सापडल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली. कारच्या नंबरच्या प्लेटच्या आधारावर मृतकांची ओळख पटली. पोलीस दोघांची डीएनए टेस्टही करणार आहे. पीडित परिवारांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, कपल अचानक गायब झालं होतं. बरीच वर्ष त्यांना शोध घेतला गेला. पण काही पत्ता लागला नाही. २१ वर्ष जुनी केस सॉल्व्ह करण्यासाठी स्कूबा डायव्हरचं कौतुक केलं जात आहे.