वॉशिंग्टन: कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या गंभीर जोखमीची चिनी सरकारला माहिती होती. असे असूनही त्यांनी आपल्या लोकांना देशाबाहेर जाऊ दिले, असं म्हणत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनला शिक्षा देण्यासाठी भविष्यातील रणनीती ठरवतील, असेही ते म्हणाले. आदल्या दिवशी ट्रम्प म्हणाले होते की, त्यांना अद्याप आपल्या चीनच्या नेतृत्वाशी बोलण्याची इच्छा नाही. त्यानंतरच पोम्पिओ यांचे विधान समोर आल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 88,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील साथीला चीनला जबाबदार धरले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर दबाव वाढताचगेल्या अनेक आठवड्यांपासून चीनवर कारवाई करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांवर दबाव वाढत होता. खासदार आणि विचारवंत म्हणतात की, चीनच्या निष्क्रियतेमुळे कोरोना विषाणू वुहानपासून जगभर पसरला आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले की, त्यांना सध्या चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलायचे नाही. माझे जिनपिंगशी संबंध चांगले आहेत, पण सध्या त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपूर्वी चीनच्या राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठमधून लीक झालेल्या डेटानुसार चीनमध्ये एकूण 6.4 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. लीक झालेल्या डेटामध्ये देशातील 230 शहरांमधील 6.4 लाख लोकांना कोरोना झाला असल्याची माहिती आहे. यामध्ये कोणत्या तारखेला प्रथम रुग्ण आढळून आला होता. तसेच फेब्रुवारी ते एप्रिलपर्यतच्या किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे, याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालय, निवासी अपार्टमेंट्स, हॉटेल, सुपरमार्केट, रेल्वे स्थानक, शाळा आणि अगदी केएफसी या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याची माहिती या डेटामध्ये देण्यात आली आहे.
चीनमध्ये 6. 4 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ही संख्या जास्त किंवा कमी देखील असू शकते. राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाने हा डेटा कसा गोळा केला याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र विविध सार्वजनिक संसाधनांची मदत घेत माहिती गोळा केली असल्याचा दावा विद्यापाठाकडून करण्यात येत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार
Coronavirus: चीनविरोधात जगातील ६२ देशांनी आखला ‘चक्रव्यूह’; कोरोनाला जबाबदार आढळल्यास...
Lockdown 4.0: जाणून घ्या, तुमच्या विभागात दुचाकी, ऑटो, बस, टॅक्सी सेवा सुरु होणार? वाचा नियम!
इस्राइलमधील राजकीय अनिश्चितता संपुष्टात, नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदी, मोदींनी दिल्या शुभेच्छा