वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरु असून, बहुदा जानेवारी महिन्यात त्यांची गच्छंती होईल, असे संकेत अमेरिकेच्या प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. परराष्ट्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी टीलर्सन यांचे अनेक मुद्यांवर मतभेद आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणी आणि इराणच्या अणूचाचणीवरुन दोघांमधील वेगवेगळे विचार समोर आले होते. टीलर्सन यांनी एका खासगी कार्यक्रमात ट्रम्प यांना मंदबुद्धीचे असे म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर व्हाइट हाउस टीलर्सन यांना पदावरुन दूर करण्यावर जवळपास निश्चित झाले असून, त्यांच्या जागेवर सीआयएचे प्रमुख माईक पॉम्पीओ यांच्या नावावर विचार सुरु आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांच्या गच्छंतीचे संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 2:35 AM