जेरुसलेम : इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सैनिकांना गाझामध्ये जमिनीवरून हल्ला करण्यास सज्ज राहण्याचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी गाझावरील हवाई हल्ले आणखी वाढवण्यात आले आहे.लेबनॉनजवळच्या सीमेजवळील एका मोठ्या शहरातील नागरिकांना इस्रायलने दुसरीकडे हलविण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने गाझामधील तब्बल ९०० वर्षे जुन्या चर्चवर हल्ला करून ते नष्ट केली आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेने इस्रायलच्या दिशेने जाणारी क्षेपणास्त्रे पाडली. ही कारवाई अमेरिकन सैन्याने इस्रायलच्या संरक्षणासाठी उचललेले पहिले पाऊल आहे.
इस्रायलकडून सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या दक्षिण भागावरही हल्ले करण्यात येत आहेत. येथील नागरिकांना तत्काळ परिसर सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीवरून कारवाई केल्यास युद्धात उतरण्याचा इशारा अरब देशांनी केल्याने जमिनीवरून कारवाई सध्या होत नसल्याचे समोर आले आहे.गाझामधील अधिकारी इजिप्तमधून येत असलेल्या अत्यंत आवश्यक असलेल्या मदतीची व्यवस्था करत आहेत. त्याचवेळी गाझाची रुग्णालये जनरेटरसाठी इंधन आणि वैद्यकीय पुरवठा याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अंधारात बुडलेल्या वॉर्डांमध्ये डॉक्टर मोबाईलच्या उजेडात शस्त्रक्रिया करत असल्याची परिस्थिती आहे.
तोपर्यंत त्यांचा गणवेश शिवणार नाहीकोची : २०१५ पासून इस्रायली पोलिसांसाठी गणवेश पुरविणाऱ्या राज्यातील एका पोशाख कंपनीने युद्धग्रस्त भागात शांतता प्रस्थापित होईपर्यंत इस्रायलकडून गणवेशाची पुढील ऑर्डर न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील कूथुपरंबू येथे गणवेशाचे उत्पादन करून जगभर त्याची निर्यात करणारी मारियन ॲपरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विविध ठिकाणांवर बॉम्बहल्ले करून निरपराधांचे जीव घेण्यास नैतिक आक्षेप असल्याने मारियन ॲपरलने युद्धग्रस्त प्रदेशात शांतता प्रस्थापित होईपर्यंत इस्रायलकडून गणवेशाची पुढील ऑर्डर न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
कितीही वेळ लागो, संपवणारच गाझा सीमेवर उपस्थित असलेले इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेट यांनी सुरक्षा दलांना एकत्र येत आतमध्ये घुसण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी आत्तापर्यंत गाझा बाहेरून पाहिला आहे ते आता आतून पाहतील. एक आठवडा, एक महिना, दोन महिने, कितीही वेळ लागेल, आम्हाला त्यांचा संपवायचेच आहे, असे ते यावेळी सैन्याला म्हणाले.
मोबाइलच्या उजेडात उपचारnइजिप्त-गाझा सीमा बंद केल्याने गाझाच्या हॉस्पिटल्समध्ये भयानक परिस्थिती ओढवली आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये वीज नाही आणि वैद्यकीय कर्मचारी प्रकाशासाठी मोबाईल फोन वापरत आहेत. nइस्रायल व हमासमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी आता चीनने आपला दूत मध्य पूर्वेच्या देशांकडे रवाना केला आहे.
रशिया आणि हमासचे एकच लक्ष्य : बायडेनअमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युद्धादरम्यान ‘आज आणि नेहमीही’ इस्रायलच्या सुरक्षेसाठी कायम पाठिंबा देण्याचे वचन दिले. त्यांनी गाझामधील सध्याच्या युद्धाचा संबंध युक्रेनवरील रशियन हल्ल्याशी जोडला आणि म्हटले की, हमास आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोघेही लोकशाही पूर्णपणे नष्ट करू इच्छित आहेत.