पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अमेरिकेत पंतप्रधान मोदींसाठी आयोजित करण्यात आलेल्या शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमावेळी एक असा प्रसंग घडला, ज्याची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ वॉशिंग्टन डीसीतील रोनाल्ड रीगन इमारतीत एका कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या समारंभात ग्रॅमी पुरस्कार विजेती अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेनने असे काही केले की, ज्याचे आज प्रत्येक भारतीय कौतुक करत आहे. मेरी मिलबेनने प्रथम भारताचे राष्ट्रगीत गाऊन सर्वांची मने जिंकली आणि नंतर पीएम मोदींना वाकून नमस्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
पंतप्रधा मोदी यांच्या 3 दिवसीय अमेरिका दौऱ्यातील आखेरच्या दिवशीचा हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाचे मन जिंकत आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकन सिंगरच्या आवाजात आपल्या देशाचे राष्ट्रगीत ऐकूण लोक स्तब्ध होत आहेत.
मेरी मिलबेनने पंतप्रधान मोदींना वाकून नमस्कार केला - एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मेरीने राष्ट्रगीत संपवताच मोदी टाळ्या वाजवत हस्तांदोलन करण्यासाठी पुढे सरकले. मात्र, याच वेळी मेरीने खाली वाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायांना स्पर्षकरत नमस्कार केला. हे पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मैरीच्या या कृतीचे केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण अमेरिकेतही जबरदस्त कौतुक होत आहे.
भारताच्या 74व्या स्वतंत्र्य दिनाच्या दिवशीह गायलं होतं राष्ट्रगीत -भारतातही मेरी मिलबेनचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. मेरीने यापूर्वी 'ओम जय जगदीश हरे' देखील गायले आहे. जे दिवाळीच्या वेळी व्हायरल झाले होते. याशिवाय तिने भारताच्या 74व्या स्वतंत्र्य दिनीही राष्ट्रगीत गायले होते. तेव्हाही तिचे प्रचंड कोतुक झाले होते.