नवी दिल्ली - अमेरिकेने पुन्हा एकदा इराकमधील आयएसआयएस संघटनांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेटच्या तळांवर हवाई हल्ला करुन अमेरिकनं सैन्यानं तळं उद्धवस्त केले आहेत. अमेरिकेच्या एअर फोर्सने 36 हजार किलो वजनाचे बॉम्ब या तळांवर टाकले आहेत. अमेरिकेच्या आधुनिक एफ-35 आणि एफ 15 लढाऊ विमानांनी हे बॉम्ब हल्ले केले आहेत.
अमेरिकेने इराकमधील तिगडी नदीवरील आयलँड टापू येथे हे बॉम्बहल्ले केले आहेत. आयएस या दहशतवादी संघटनेविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यासाठी अमेरिकेला इराकच्या सैन्याकूडन मदत मिळत आहे. दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेटच्या तळांना उद्धवस्त करणे हाच या हल्ल्यामागील उद्देश असून दहशवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न आहे. इराकमधील मोसुलच्या सिरीया आणि जजीरा वाळवंट प्रदेशासह आयएसच्या दहशतवाद्यांनी किर्कुक आणि मखमौर येथे आपले तळं ठोकले आहेत. कनस आयलँड, कयारा स्थिति अमेरिकेच्या ऑपरेशन बेसजवळच आहेत.
अमेरिका आणि इराकच्या करारानंतर अमेरिकेच्या सैन्याने दुसऱ्यांदा एवढा मोठा हल्ला केला आहे. इराकी पंतप्रधान हैदर अली अबादी यांनी 2017 मध्ये आयएसचा खात्मा करण्याचा संकल्प केला होता. पण, त्यांना या कार्यात यश आलं नाही. त्यामुळे अमेरिकेनेच पुढाकार घेऊन इराकमधील आयएसच्या तळांवर बॉम्बहल्ले केले आहेत. अमेरिकेने पहिल्यांदाच एफ 35 या लढाऊ विमानांचा वापर करून बॉम्ब टाकले आहेत. एफ 35 या विमानाची क्षमता मोठी असून यामध्ये 8,100 किलो वजनाचे तर एफ 15 हे 13,380 किलोग्रॅम वजनाच्या बॉम्ब आणि साहित्यांची वाहतूक करू शकते.