वॉशिंग्टन : भारताचा आक्षेप बाजूला सारून अमेरिकन काँग्रेसने एच-वनबी आणि एल-वन व्हिसाचे शुल्क दुप्पट म्हणजे ४,५०० डॉलर केले. ९/११ च्या आरोग्यसेवा कायद्याला आणि बायोमेट्रिक ट्रॅकिंग सिस्टीमला निधी पुरविण्यासाठी हे शुल्क वाढविण्यात आले असून त्याचा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना बसणार आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी १.१ ट्रिलियन डॉलरच्या खर्चाच्या विधेयकाला मान्यता देताना एच-वनबीच्या विशिष्ट वर्गातील व्हिसावर ४००० डॉलरचे विशेष शुल्क आणि एल-वन व्हिसा ४,५०० डॉलर करण्याचा निर्णय घेतला. हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये १.१ ट्रिलियन डॉलरच्या खर्चाच्या विधेयकावर १८ डिसेंबर रोजी मतदान होईल. ही तात्पुरती तरतूद असल्याचे सिनेटर्सचे म्हणणे आहे. नवे एच-वनबी आणि एल-वन व्हिसा शुल्क पूर्वी पाच वर्षांसाठी होते ते आता दहा वर्षांसाठी करण्यात आले आहे. हे शुल्क २०१० ते २०१५ कालावधीसाठी एच-वनबी व्हिसासाठी २,००० डॉलर होते. त्याची मुदत गेल्या ३० सप्टेंबर रोजी संपली.
अमेरिका व्हिसा शुल्क दुप्पट
By admin | Published: December 18, 2015 12:51 AM