नवी दिल्ली - पाकिस्तान नव्या अणुबॉम्मची निर्मिती करत असून त्याचा सर्वाधिक धोका भारताला असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने दिला आहे. भारत व पाकिस्तान दरम्यानचे संबंधही भविष्यात तणावाचे राहाणार असल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. पाकिस्तान भारतावर मोठा अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पाकिस्तान भयंकर अण्वस्त्रांबरोबरच युध्दात वापरल्या जाणाऱ्या लहान मोठ्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करत आहे. तसेच जमिनीवरुन जमिनीवर व आकाशात मारा करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यास पाकिस्तानने सुरुवात केली आहे. अशी खळबळजनक माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणानी दिली आहे. पाकस्तानातील दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करून हल्ले चढविणे सुरूच ठेवले, तर त्याच्या परिणामी दोन्ही देशांच्या सैन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही चकमकी सुरूच राहातील, असेही डॅन कोट्स यांनी सांगितले.
भारत-चीन संबंध आणखी बिघडण्याची शक्यता! भारताचे चीन व पाकिस्तान बरोबर ताणले गेलेले संबंध भविष्यात आणखी बिघडण्याची शक्यता आहे असे अमेरिकेचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख डॅन कोट्स यांनी म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालय व सरकारी प्रसारमाध्यमे भारताच्या विरोधात सतत आगपाखड करीत असून त्यामुळे या दोन देशांतील तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. भारत व चीनने संयम बाळगला, तर या तणावात भर पडणारही नाही. परंतु असे होणे जरा अशक्यच दिसते.