वॉशिंग्टन: भारतातीलव्हिसा प्रतीक्षा कालावधी घटविण्यासाठी अमेरिका आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे, ज्यामध्ये अधिकाऱ्यांचे एक कॅडर देशात पाठवणे आणि भारतीयव्हिसा अर्जदारांसाठी थायलंड, जर्मनीपर्यंत दूरवर आपले दूतावास उघडणे समाविष्ट आहे, अशी माहिती वरिष्ठ व्हिसा अधिकाऱ्याने दिली.
प्रथमच व्हिसा अर्जदारांसाठी, विशेषत: बी १ (व्यवसाय) आणि बी २ (पर्यटक) श्रेणींमध्ये अर्ज करणाऱ्यांसाठी दीर्घ प्रतीक्षा कालावधीबद्दल भारतात चिंता वाढत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा काळ तब्बल तीन वर्षे होता. “आम्ही भारतातील व्हिसा प्रतीक्षा वेळ घटवण्यासाठी आमची प्रत्येक ऊर्जा खर्च करत आहोत,” असे व्हिसा सेवा उप-सहाय्यक सचिव ज्युली स्टफट यांनी सांगितले. एच-१ बी आणि एल १ व्हिसासाठी मुलाखतीची प्रतीक्षा वेळ १८ महिन्यांवरून ६० दिवसांवर आली आहे. तंत्रज्ञान उद्योगातील अनेक कुशल परदेशी कामगारांसाठी असलेला एच-१ बी आणि इतर व्हिसा प्राप्त करणाऱ्यांत भारतीयांचा मोठा वाटा आहे.