वॉशिंग्टन/बीजिंग : कोरोना विषाणूंच्या संकटाबाबत बेजाबाबदारपणे काम करीत असल्याचा आरोप करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) आर्थिक मदत रोखण्याचा आदेश दिला आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने चिंता व्यक्त करीत या संघटनेला दिले जाणारे योगदान वाढविण्याचेही संकेत दिले आहेत.
कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यात गैरव्यवस्थापन आणि माहिती दडविल्याप्ररणी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेचा आढावा घेतला जात असून, तोवर जागतिक आरोग्य संघटनेला दिली जाणारी अािर्थक मदत रोखण्याचे निर्देश देत आहे, अशी घोषणा ट्रम्प यांनी मंगळवारी केली होती.अमेरिका दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेला ४० ते ५० कोटी डॉलर देते. चीन ४ कोटी डॉलर किंवा त्यापेक्षा कमी निधी देतो. कोरोनाच्या उद्रेकात आपले कर्तव्य पार पाडण्यास जागतिक आरोग्य संघटना पूर्णत: अपयशी ठरली आहे. चीनमध्ये या विषाणूंचा प्रसार झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ही बाब लपविण्याचा प्रयत्न केला. यासाठी या संघटनेला जबाबदार धरले पाहिजे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हा निर्णय चिंताजनक आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओची क्षमता कमी होईल आणि कोरोना रोगाच्या साथीविरोधी मोहिमेतील आंतरराष्टÑीय सहकार्य दुर्लक्षित होईल, असे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी म्हटले आहे. कोविड-१९ चा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृत आणि व्यावसायिकपणे भूमिका पार पाडली आहे.फूट नव्हे, एकजुटीला प्रोत्साहन द्याच्जागतिक आरोग्य संघटनेची आर्थिक मदत रोखण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर युरोपीय संघ आणि जर्मनीनेही टीका केली आहे. युरोपीय संघाच्या विदेश धोरणाचे प्रमुख जोसेफ बॉरेल यांनी अमेरिकेला फूट पाडण्याऐवजी एकजुटीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.च्कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला निधीची सर्वाधिक गरज असताना अमेरिकेने घेतलेला निर्णय खेदजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.च्जर्मनीचे विदेशमंत्री हेईको मॅस यांनी म्हटले की, कोरोना संकटासाठी एक दुसऱ्याला दोष देऊ नये. याने काहीही साध्य होणार नाही. संयुक्त राष्टÑाला मजबूत केले पाहिजे, तसेच संसर्ग चाचणी आणि त्यावर लस शोधण्यात सहकार्य केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.