अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एका महिलेने 28 वयात कॅन्सर न होताही आपले दोन्ही ब्रेस्ट कापून टाकले. स्टेफनी जर्मिनो नावाच्या या महिला 15 वयात समजलं होतं की, तिला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका आहे. जेव्हा ती 27 वर्षांची होती तेव्हा तिच्या BRCA1 जीन म्यूटेशची पुष्टी झाली होती. तिची 77 वर्षीय आजी टेरेसा आणि 52 वर्षीय आई गर्ब्रीयेला सुद्धा BRCA1 पॉझिटिव्ह होती.
BRCA1 जीनमध्ये म्यूटेशन ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. सगळ्याच महिलांमध्ये BRCA1 आणि BRCA2 जीन असतात, पण ज्या महिलांच्या जीन्समध्ये म्यूटेशन होतं. त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो. जीनमध्ये म्यूटेशन झाल्याने अनेकदा त्याला आपलं काम ठीकपणे करण्यास रोखतं.
BRCA1 जीन म्यूटेशनचं निदान झाल्यानंत स्टेफनीने 27 वयात कॅन्सर वाढण्यापासून रोखण्यासाठी डबल मास्टेक्टॉनी करण्याचा निर्णय घेतला. स्टेफनीला एक मुलगाही आहे. ती म्हणाली की, 'मी फार भावूक होते. पण मी याला मृत्यूदंडासारखं पाहिलं नाही'.
स्टेफनीने सांगितलं की, 'मला आधीच माहीत होतं की, माझ्या परिवारात स्तन कॅन्सरचा इतिहास आहे. कारण माझ्या आजीला हो दोनदा झाला होता. जेव्हा मी जवळपास 15 वर्षांची होते, तेव्हा मला माझ्या आईने सांगितलं होतं की, ती BRCA1 जीन पॉझिटिव आहे. त्यामुळे मला जास्त धोका होता. मला माहीत होतं की, मला स्तनाचा कॅन्सर आणि ओवेरियन कॅन्सरचा 87 टक्के धोका आहे'.
स्टेफनीने इतर महिलांच्या उलट ब्रेस्ट इम्लांट करण्याऐवजी फ्लॅट चेस्ट ठेवण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितलं की, मुळात ब्रेस्ट इम्लांटवर बराच विचार केल्यावर मी निर्णय घेतला की, मला फ्लॅट रहायचं आङे आणि मी अशाप्रकारे जास्त सहज राहू शकते. मला असं वाटलं की, माझ्या स्तनांमधून दूध पिऊन माझ्या मुलाने त्याचा उद्देश पूर्ण केला आहे'. स्टेफनीने 28 वयात परिवार आणि पार्टनर डायनाच्या सपोर्टने आपली सर्जरी केली आणि तिच्या आधीपेक्षा जास्त आत्मविश्वास आला आहे.
स्टेफनी म्हणाली की, 'मुळात तिला तिच्या स्तनांवर अजिबात प्रेम नाही आणि मी त्यांना कधीही महिलेची ओळख या रूपात पाहिलं नाही. त्यामुळे मला जेव्हा डॉक्टर असं म्हणाले तर माझ्यासाठी ब्रेस्ट कापण्याचा निर्णय फार अवघड गेला नाही'.
ती म्हणाली की, 'केवळ समाजाचं मत आहे की, स्तनांमुळे महिलांची ओळख आहे. हे सत्य नाहीये. तुम्हाला इंम्प्लांट करण्याची गरज नाही. तुम्ही त्याशिवायही जगू शकता. याने तुम्हाला कमतरता जाणवणार नाही'.
स्टेफनीने सांगितलं की, 'इतकंच काय तर डॉक्टरांनी मला इंम्प्लांट करण्यास सांगितलं. पण मी फ्लॅट चेस्टसोबत फार आनंदी आहे आणि मला आत्मविश्वासी वाटत आहे. याने मला वेगळं वाटतं आणि यावर माझं प्रेम आहे'.