अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यातील एका अश्वेत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुरू झालेली निदर्शने मिनी पोलीस क्षेत्राच्या बाहेरही पसरली आहेत. अमेरिकेत सुरू असलेला हिंसाचार थांबलेला नाही. निदर्शकांनी सेंट पॉल मार्गावर लुटमार व जाळपोळ केली, तसेच ते यापूर्वी हिंसक निदर्शने झालेल्या जागीही गेले, जेथे आधीच मोठे नुकसान झालेले होते. आंदोलनकर्त्यांनी एका पोलीस ठाण्याला आग लावली. अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत आहे. याप्रकरणी आतापर्यंत अमेरिकेतील 1400 जणांना अटक करण्यात आली आहे.
जॉर्ज फ्लोयड या व्यक्तीच्या मानेवर एका पोलीस अधिकाऱ्याने गुडघा ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त करत आहेत. लॉस एंजिल्स, फिलाडेल्फियासह 16 राज्यांतील 25 शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या काही गाड्याही आंदोलनकर्त्यांनी जाळल्या आहेत. तसेच 13 पोलीस यामध्ये जखमी झाले आहेत. आतापर्यंत तब्बल 1400 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रेसिंक्ट पोलीस ठाणे तातडीने रिकामे करण्यात आले. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये निदर्शक पोलीस ठाण्यात घुसताना व इमारतीला आग लावताना दिसत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्थितीवर नेतृत्वाचा पूर्ण अभाव अशी टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आताच गव्हर्नर टिम वाल्ज यांच्याशी चर्चा केली. त्यांचे म्हणणे आहे की, लष्कर त्यांच्यासमवेत आहे. लुटालूट सुरू होताना गोळीबारही होत आहे. फ्लोयडच्या मृत्यूनंतर सलग तिसऱ्या रात्रीही निदर्शने झाली. लुटमारीपासून वाचण्यासाठी व्यावसायिकांनी आपल्या दुकानांच्या खिडक्या, दारे बंद केल्या. अमेरिकेतील एका कंपनीने आपले 24 स्टोअर्स तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"
CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक
CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र
CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान
CoronaVirus News : बिहारच्या ज्योतीकुमारीचा गरीब बाप; चटका लावून जाणारी कहाणी