शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळविरांनी..."
3
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
4
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
5
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
6
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
7
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
8
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
9
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
10
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
11
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
12
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
13
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
14
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
15
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
16
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
17
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
18
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
19
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
20
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...

"हमासचे हात...", ओलिसांमध्ये अमेरिकन नागरिकाचा मृदेह आढळल्याने कमला हॅरिस भडकल्या; केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 4:09 PM

कमला हॅरिस म्हणाल्या, 7 ऑक्टोबरला अमेरिकन हर्ष गोल्डबर्ग-पोलिनला हमासच्या दहशतवाद्यांनी बंदी बनवले होते. तो केवळ 23 वर्षांचा होता आणि मित्रांसोबत एका संगित कार्यक्रमासाठी गेला होता.

गाझा पट्टीतील रफाह शहरामध्ये हमासच्या बोगद्यात एका अमेरिकन तरुणासह सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी मोठे विधान केले आहे. हमासला एक 'दुष्ट दहशतवादी संघटना' असल्याचे संबोधत, त्यांचे हात आणखीही काही अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने माखलेले असल्याचे म्हटले आहे. हर्ष गोल्डबर्ग-पॉलिन या अमेरिकन तरुणाच्या मृत्यूसंदर्भात त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून त्याच्या पालकांप्रतीही संवेदना व्यक्त केल्या आहेत.

कमला हॅरिस म्हणाल्या, 7 ऑक्टोबरला अमेरिकन हर्ष गोल्डबर्ग-पोलिनला हमासच्या दहशतवाद्यांनी बंदी बनवले होते. तो केवळ 23 वर्षांचा होता आणि मित्रांसोबत एका संगित कार्यक्रमासाठी गेला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी त्याची हत्या केल्याचे वृत्त आहे. त्याचा मृतदेह इतर पाच बंधकांच्या मृदेहांसह ताब्यात घेण्यात आला आहे.

आम्ही पीडीत कुटुंबीयांसोबत -कमला हॅरिस यांनी गोल्डबर्गचे पालक जॉन पोलिन आणि रॅचेल गोल्डबर्ग-पॉलिन यांच्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपण हर्षला ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्या पुढे म्हणआल्या, "या वर्षाच्या सुरुवातीला मी जेव्हा जॉन आणि रॅचेल यांना भेटले होते, तेव्हा मी त्यांना सांगितले की ते एकटे नाहीत. अमेरिकन आणि जगभरातील लोक जॉन, रेचेल आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतील."

कमला म्हणाल्या, "हमासकडून इस्रायली आणि इस्रायलमधील अमेरिकन नागरिकांना असलेला धोका संपुष्टात यायला हवा. हमास गाझावर नियंत्रण करू शकत नाही. पॅलेस्टिनी जनतेलाही हमासच्या राजवटीत जवळपास दोन दशके त्रास सहन करावा लागला आहे."

ओलिसांची सुटका करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करेल -कमला म्हणाल्या, व्हीपी या नात्याने अमेरिकन नागरिकांची सुरक्षितता आपल्यासाठी सर्वात महत्वाची आहे. मग ते जगात कुठेही असोत. राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि आपण अमेरिकन आणि गाझामध्ये ओलिस असलेल्या सर्वांना मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहोत त्याशिवाय मागेहटणार नाही.

टॅग्स :Kamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिकाPalestineपॅलेस्टाइनIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध