ऑनलाइन टीम
सिडनी(ऑस्ट्रेलिया), दि. २२ - निरोध वापरल्याने एडस् साठी कारणीभूत असलेल्या एचआयव्हीच्या व्हायरसची बाधा होण्याची शक्यता ९९.९९ टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. स्टारफार्मा या बायोटेक कंपनीने निरोधात वापरण्यात येणा-या जेल मधून एचआयव्ही एड्स होण्याची शक्यता कमी असल्याचे संशोधनातून सिद्ध केले आहे. त्यांनी निरोधात वापरण्यात येणा-या व्हिवाजेलमुळे एचआयव्हीचे विषाणू ९९.९९ टक्क्यांपर्यंत रोखले जात असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. व्हिवा जेल हे अँटी व्हायरल व अँटी बॅक्टेरीअल असल्याचे स्टारफार्माचे कर्मचारी जॅकी फेअरली यांनी सांगितले. तसेच ऑस्ट्रलीयन नियामक संस्थेने या संशोधनाला मान्यता दिली असून काही महिन्यांतच आमचे प्रोडक्ट सर्वत्र उपलब्ध असेल. असे त्यांनी सांगितले.