युक्रेन आणि रशिया दरम्यानचे युद्ध पुढील टप्प्यात पोहोचले असून एकमेकांवर बॅलेस्टिक मिसाईलचा मारा सुरु झाला आहे. यामुळे खवळलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. यामुळे जग हादरलेले असताना सिडनीतील बिशप मेरी इमॅन्युएल यांनी तिसरे महायुद्ध आणि त्याचे विनाशकारी परिणाम याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
तिसरे विश्वयुद्ध एक भयावह ठरणार असून यात अण्वस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. यात जगातील एक तृतीयांश लोकसंख्या मृत्यूमुखी पडणार असल्याची भविष्यवाणी इमॅन्युएल यांनी केली आहे. तसेच यात जे वाचलेले लोक आहेत ते एवढ्या समस्यांना सामोरे जातील की आम्हीही का मृत्यूमुखी पडलो नाही, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येईल असे त्यांनी म्हटले आहे.
ट्विटरव्दारे इमॅन्युएल यांनी जगाला हा इशारा दिला आहे. इमॅन्युएल हे ऑस्ट्रेलियातील एक नावाजलेले बिशप आहेत. हे युद्ध लवकरच सुरु होणार असल्याचे सांगत त्यांनी हा सर्वात मोठा विनाश असेल असेल ते म्हणाले आहेत. लवकरच आकाशात रॉकेट उडताना दिसणार आहेत. अण्वस्त्रांच्या वापरामुळे मानवजातीसाठी कोमतीही आशा राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
ही शस्त्रे केवळ वापरण्यासाठी बनविण्यात आलेली आहेत. ती सेल्फी काढण्यासाठी किंवा सांभाळून ठेवण्यासाठी नाहीत. या अण्वस्त्रांचा लवकरच वापर झालेला दिसणार आहे, जी जगावर भयानक संकट बनून कोसळणार आहेत, असे बिशप म्हणाले आहेत. अमेरिकेच्या फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने अण्वस्त्र हल्ला टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याचवेळी हा इशारा आला आहे.