लखनऊ - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 70 लाखांच्या वर गेली आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. भारतही कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. कोरोनाची परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळण्यात आली त्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं कौतुक होत आहे. फक्त भारतातच नाही तर चक्क पाकिस्तानेहीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भरभरून कौतुक केलं आहे.
पाकिस्तानमधील लोकप्रिय वृत्तपत्र असलेल्या 'द डॉन' चे संपादक फहद हुसैन यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याची हुसैन यांनी स्तूती केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पेक्षा योगीचं नेतृत्व चांगलं आहे. कोरोना संकटाच्या काळात पाकिस्तान आणि उत्तर प्रदेशमधील सरकारच्या कार्याची त्यांनी तुलना केली आहे. ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी कौतुक केलं आहे.
उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 208 मिलियन आहे तर उत्तर प्रदेशची 225 मिलियन आहे. पाकिस्तानच्या तुलनेत उत्तर प्रदेशमधील मृतांची संख्या ही खूप कमी आहे. हुसैन यांनी ट्विटर अकाऊंटवरून एक आलेख शेअर केला, ज्यात उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानच्या आकडेवारीची तुलना केली होती. पाकिस्तानमध्ये मृत्यू दर हा उत्तर प्रदेशपेक्षा सात पट जास्त असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
पाकिस्तान आणि उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. पण उत्तर प्रदेशने लॉकडाऊनचं कसं काटेकोर पालन केलं आणि पाकिस्तानला अपयश आलं असं हुसैन यांनी म्हटलं आहे. तसेच पाकिस्तानमध्ये लोकसंख्येची घनता उत्तर प्रदेशपेक्षा कमी आहे आणि जीडीपीही जास्त आहे. उत्तर प्रदेशात कडक लॉकडाऊन पाळण्यात आलं, जे आपण केलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी इम्रान खान यांचे सरकार कसा संघर्ष करत आहे, यावर हुसैन यांनी अग्रलेख लिहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गुगल सर्चमध्ये दिसताहेत Whatsapp नंबर; कोणीही करू शकतं मेसेज पण कसं...
"...म्हणून चीनी मालावर बहिष्काराचा 'सर्जिकल स्ट्राईक' हवाच"
CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी
Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा
Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!
CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध