पहिल्या कोरोनावर यशस्वी आणि परिणामकारक लस तयार केल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधक आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर लस शोधण्याच्या कामी लागले आहेत. ब्रिटनसह अन्य देशांमध्ये नवीन कोरोनाने धुमाकूळ घातल्याने या वैज्ञानिकांनी उसंत न घेता काम सुरु केले आहे.
वैज्ञानिकांनी सांगितले की, कोरोनाची लस नवीन स्ट्रेनवरही परिणामकारक आहे. मात्र, त्याच्या प्रभावामध्ये फरक पडला तर प्रयोगशाळेत सेल कल्चरद्वारे या लसीमध्ये एका दिवसात बदल करता येईल, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केला. यानंतर ही नवीन बदल केलेल लस कोरोनाला संपविण्याचे काम करेल. या लसीच्या परिक्षणाचे निकाल फेब्रुवारीच्या मध्यावर येणार असल्याचे, मुख्य संशोधक प्रो. साराह गिलबर्ट यांनी सांगितले.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार टीमचे सदस्य कोरोना व्हायरसच्या नव्या बदलत्या रुपांवर लक्ष ठेवून आहेत. नवीन वर्षात कोरोनाचे आणखी काही स्ट्रेन येण्याची शक्यता आहे. कोरोनामध्ये कोणताही बदल झाला तर त्यावर लसीमध्येही बदल करण्यात येतील. जरी लसीमध्ये बदल झाले तरी त्याच्या उत्पादनात आणि वितरणात कोणताही फरक पडता नये अशी तयारी करण्यात येत आहे.
भारतातही कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे लसीकरण सुरु झाले आहे. जगभरातील ज्या देशांमध्ये या लसीचे उत्पादन घेतले जात आहे, त्या देशांनी नवीन लसीसाठी तयार रहायला हवे. डब्ल्यूएचओनुसार कोरोनाचा नवीन स्ट्रेन आता जगातील 60 देशांमध्ये पोहोचला आहे.
लसीकरण सुरु ठेवायचे का? लीड्स विद्यापीठाच्या व्हायरॉलॉजिस्च प्रो. स्टीफन ग्रिफिन यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवीन स्ट्रेन स्ट्रेन 501वायव्ही2 वर संशोधन केले असता मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. हा नवीन स्ट्रेन शरीरातील प्रतिरोधकांना धोका देऊ शकतो. लस टोचल्याने काही नुकसान होणार नाही. नवीन स्ट्रेनमुळे लसीकरण अभियान थांबता नये.
कोरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा कोरोना होण्याचा धोका...
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आतापर्यंत करोडो लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. जे लोक आधीपासूनच या व्हायरसनं संक्रमित आहेत. त्यांना कोरोना व्हायरस पुन्हा संक्रमित करू शकतो, अशी नवीन माहिती समोर येत आहे. जे लोक या व्हायरसनं संक्रमित झाले आहेत. त्यांच्या शरीरात व्हायरसशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो. पण कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनबाबत हे संभव आहे की नाही याचे उत्तर आता सापडलं आहे. असा दावा दक्षिण आफ्रकेतील राष्ट्रीय संक्रामक आरोग्य संस्थानाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
वैज्ञानिकांनी यावर एक रिसर्च केला होता. त्यानुसार अर्ध्या लोकांच्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये दिसून आले की, शरीरातील एंटीबॉडी नवीन स्ट्रेनशी लढण्यासाठी हवी असलेली क्षमता गमावतात. त्यामुळेच पुन्हा संक्रमित होण्यापासून वाचवलं जाऊ शकत नाही. या चाचणीत सहभागी असलेल्या लोकांच्या रक्तात एंटीबॉडीजचा स्तर कमी झाल्याचे दिसून आले.