रशियाच्या ताफ्यात व्हॅक्यूम बॉम्ब?; आतापर्यंत कुठे झाला वापर, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:00 AM2022-03-14T09:00:32+5:302022-03-14T09:00:37+5:30

अतिशय घातक असलेल्या व्हॅक्यूम बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्यासाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय कायदे नाहीत.

Vacuum bombs in Russia's fleet ?; Learn the rules of using a vacuum bomb! | रशियाच्या ताफ्यात व्हॅक्यूम बॉम्ब?; आतापर्यंत कुठे झाला वापर, जाणून घ्या!

रशियाच्या ताफ्यात व्हॅक्यूम बॉम्ब?; आतापर्यंत कुठे झाला वापर, जाणून घ्या!

Next

क्षणार्धात मानवी शरीराचे वाफेत रुपांतर करू शकणारा व्हॅक्यूम बॉम्ब रशियाच्या ताफ्यात आहे. गेल्या १८ दिवसांपासून युक्रेनवर बॉम्बवर्षाव करणारा रशिया या बॉम्बचा वापर करणारच नाही, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे युद्ध लवकर थांबून उभय देशांमध्ये तोडगा निघावा यासाठी जागतिक नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जाणून घेऊ या व्हॅक्यूम बॉम्बविषयी....

आतापर्यंत कुठे झाला वापर?

पहिले महायुद्ध- व्हॅक्यूम बॉम्बचा सर्वप्रथम वापर जर्मनीने पहिल्या महायुद्धाच्या काळात केला होता.

१९६०- अमेरिकेने व्हिएतनाम युद्धात या बॉम्बचा  वापर केला होता.

२००२- ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी अफगाणिस्तानात अमेरिकेने व्हॅक्यूम बॉम्ब वापरला.

२०१७- आयसिसविरोधातही अमेरिकेने पुन्हा या बॉम्बचा वापर केला. रशियन सैन्याने चेचेन्यात तसेच सीरियातही या बॉम्बचा वापर केला.

व्हॅक्यूम बॉम्बच्या वापराचे नियम काय?

अतिशय घातक असलेल्या व्हॅक्यूम बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्यासाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय कायदे नाहीत. एखाद्या देशाने निवासी भागात, शाळा, रुग्णालये असलेल्या परिसरात या बॉम्बचा वापर केल्यास त्या देशावर हेग कन्व्हेन्शन १८९९ आणि १९०७ अन्वये खटला चालवला जातो. रशिया कदाचित युक्रेनमध्ये या बॉम्बचा वापर करणार नाही, अशी आंतरराष्ट्रीय अटकळ आहे.

Web Title: Vacuum bombs in Russia's fleet ?; Learn the rules of using a vacuum bomb!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.