ग्रेनोबल (फ्रान्स): अनुक्रमे ५१ आणि ६७ वर्षांपूर्वी अपघात होऊन फ्रान्समधील आल्प्स पर्वतराजींत कोसळलेल्या एअर इंडियाच्या दोनपैकी एका विमानातील प्रवाशांच्या मृतदेहांचे अवशेष सापडले असण्याची शक्यता आहे.मुंबईहून न्यूयॉर्ककडे जाणारे एअर इंडियाचे एक बोर्इंग ७०७ विमान जानेवारी १९६६ मध्ये आल्प्स पवर्तताच्या माँट ब्लँक शिखराच्या परिसरात कोसळून त्यातील सर्व ११७ प्रवासी ठार झाले होते. त्याआधी सन १९५० मध्ये याच पर्वतावर एअर इंडियाचे आणखी एक विमान पडले होते व त्यात ४८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. डॅनिएल रोश या हौशी शोधकर्त्याला अत्यंत दुर्गम जागी झालेल्या विमान अपघातांच्या ठिकाणी जाऊन तेथे काही सापडते का हे शोधण्याची हौस आहे. आल्प्स पर्वतांतील बॉसन्स हिमनदीच्या परिसरात डॅनिएल अनेक वर्षे शोध घेत आहे. इतकी वर्षे त्याला अपघाताशी दुवा जुळू शकेल अशा इतर अनेक वस्तू सापडल्या होत्या. पण आता त्याला प्रथमच मानवी मृतदेहांचे दोन अवशेष-एक हात व एका पायाचा वरचा भाग सापडला आहे.हा हात व पायाचा भाग सन १९६६ मधील एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील महिला प्रवाशाचा असावा असे डॅनिएलला वाटते. कारण हे दोन मानवी अवशेष जेथे सापडले, त्याच्या जवळपास त्याला विमानाच्या चारपैकी एक इंजिनही सापडले आहे.डॅनिएलने जवळच असलेल्या चॅमोनिक्स खोºयातील आपात्कालिन सेवा कार्यालयाला ही माहिती दिल्यानंतर तेथील अधिकाºयांनी हेलिकॉप्टर पाठवून पर्वतावरून हे मानवी अवशेष खाली आणले. आता तज्ज्ञ त्यांची चाचणी करणार आहेत.डॅनिएलला सापडलेला मानवी हात व पायाचा भाग कदाचित एकाच व्यक्तीच्या शरीराचा नसावा. ते दोन निरनिराळ््या व्यक्तींचे अवयव असावेत, असे वाटते. पण ते दोनपैकी नेमक्या कोणत्या अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांचे असावेत, हे लगेच सांगणे कठीण आहे, असे स्थानिक पोलीस दलाचे प्रवक्ते स्टिफन बोझॉन म्हणाले. (वृत्तसंस्था)आणखी सापडली दोन प्रेतेदहा दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतराजींमधील आटत चाललेल्या हिमनदीमध्ये दोन मृतदेह सापडले होते. ते मृतदेह मर्सेलिन ड्युमोलिन आणि फ्रान्सिन या दाम्पत्याचे असल्याचे नंतर डीएनए चाचण्यांवरून स्पष्ट झाले होते. हे दोघे ७५ वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते व त्यांचे मृतदेह इतकी वर्षे बर्फामध्ये गोठलेल्या अवस्थेत जसेच्या तसे टिकून राहिले होते.
विमान अपघात; मृतांचे अवशेष ५० वर्षांनी सापडले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:30 PM