COVID Cases Rise in China: Fish And Crabs Also Undergo RT-PCR Test - चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची तयारी सुरू झाली आहे आणि RT-PCR चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. BBC ने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक लोकांना RT-PCR चाचणी करण्याचे आदेश दिले गेले आहे, तर दुसरीकडे समुद्रातील जीवांचीही चाचणी चिनच्या Xiamen येथे केली जात असल्याचे समोर आले आहे.मासे, खेकडे आदींची RT-PCR चाचणी होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल झाले आहेत. यात PPE किट्स घातलेले आरोग्य सेवक मास्याच्या तोंडातू व खेकड्याच्या कवचातून स्वॅब्सचे नमूने घेत असल्याचे दिसत आहेत.
चिनी सैरभैर! कोरोना पुन्हा वाढताच माणसांसह मासे व खेकड्यांची करतायेत RT-PCR चाचणी, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 1:34 PM