Elon Musk Starship : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्सचे मालक इलॉन मस्क नेहमी आपल्या कामाने लोकांना आश्चर्यचकित करतात. आता परत एकदा त्यांनी असा पराक्रम केला आहे, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीने हा चकीत करणारा कारनामा केला आहे. कंपनीने बनवलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टारशिप रॉकेटने उड्डाणानंतर यशस्वीरित्या आपल्या ठरलेल्या स्थानावर लँडिंग केली आहे.
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप रॉकेटचे हे पाचवे उड्डाण होते. पण, हे उड्डाण इतर उड्डाणांपेक्षा खुप खास आहे. याचे कारण म्हणजे, या सुपर हेवी स्टारशिप रॉकेटने उड्डाणानंतर यशस्वीरित्या लॉन्च पॅडवर लँडिंग केली. यशस्वीपणे लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वतः इलॉन मस्क यांनी या लँडिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पृथ्वीपासून 96 किलोमीटर अंतरावर गेलेले रॉकेट परतलेमेक्सिकोच्या सीमेजवळ असलेल्या लॉन्च साईटवरुन हे हेवी वेट स्टारशिप रॉकेट लॉन्च करण्यात आले होते. SpaceX च्या रॉकेटने पृथ्वीपासून 96 किलोमीटर उंचीपर्यंत उड्डाण केले आणि यशस्वीरित्या लँडिंग केली. विशेष म्हणजे, कंपनीने यापूर्वी चार रॉकेट लॉन्च केले होते, पण लॉन्चिंगनंतर काही वेळातच त्यांचा स्फोट झाला. अखेर स्पेसएक्सने 13 ऑक्टोबर रोजी रॉकेटचे यशस्वीपणे लॉन्चिंग आणि लँडिंग करुन इतिहास रचला.
700 पट अधिक थ्रस्ट पॉवरसह सुसज्जयापूर्वीचे स्टारशिप 6 महाकाय रॅप्टर इंजिनने सुसज्ज होते, परंतु यंदाच्या लॉन्चिंगसाठी त्यात 3 रॅप्टर इंजिन बसवण्यात आले होते. हेवी स्टारशिपच्या ताकदीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, त्याची थ्रस्ट पॉवर सामान्य फ्लाइटपेक्षा 700 पट जास्त आहे. त्याच्या बूस्टरच्या पायावर बसवलेले 33 इंजिन अंदाजे 74 मेगान्यूटनचा थ्रस्ट निर्माण करतात.