ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. २२ - नॅशनल एअरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (नासा) प्रथमच 'एक्स्प्लोडींग स्टार'चा शॉकवेव्ह व्हिडिओ कैद केला आहे. केपलर स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने हा व्हिडिओ कैद करण्यात आला आहे. एक्स्प्लोडींग स्टारच्या या व्हिडिओला खगोलशास्त्रज्ञांनी 'शॉक ब्रेकआऊट' असंदेखील नाव दिलं आहे. 20 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. 'अशाप्रकारचे शॉक ब्रेकआऊटसारखे व्हिडिओ कॅमे-यात कैद करायचे असतील तर तुम्हाला आकाशातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सलग कॅमेरा ठेवण्याची गरज असते. जे आम्हाला केपलरमुळे शक्य झालं असल्याचं', प्राध्यापक पीटर यांनी सांगितलं आहे.
For the 1st time, brilliant flash of an exploding star’s shockwave captured by @NASAKepler: https://t.co/3s8XVas6gUpic.twitter.com/eSwbajUWeF— NASA (@NASA) March 21, 2016