Justin Trudeau: भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. अशातच, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एक्सवर दिवाळी साजरी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मंदिरांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करत हिंदू समुदायाशी संवाद साधल्याचे दिसत आहे.
काय म्हणाले जस्टिन ट्रुडो?जस्टिन ट्रुडो यांनी मंदिरात दिवाळी साजरी केल्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा! या आठवड्यात हिंदू समुदायासोबत अनेक खास क्षण साजरे केले. गेल्या काही महिन्यांत मी तीन वेगवेगळ्या मंदिरांना भेट दिली. हे माझ्यासाठी सौभाग्य आहे." व्हिडिओमध्ये ट्रूडो हिंदू समुदायातील लोकांशी प्रेमाने संवाद साधताना आणि जलेबीसारख्या पारंपारिक भारतीय मिठाईचा आस्वाद घेताना दिसले.
दरम्यान, खलिस्तानी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडाने भारतावर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. हा तणाव इतका वाढला आहे की, भारताने कॅनडातील आपले उच्चायुक्त आणि इतर अधिकारी परत बोलावले आहेत. तर, भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे.