ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 14 - जगभरात बकरी ईद साजरी केली जात असताना बांगलादेशमध्ये मात्र बकरी ईदनिमित्त समोर आलेल्या फोटोंमुळे सगळं जगच हादरले आहे. बकरी ईदनिमित्त ढाकामध्ये रस्त्यांवर अक्षरक्ष: रक्ताचा महापूर आला होता असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. रक्ताचे वाहणार हे पाट पाहून सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला असेल. बांगलादेशमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु असून पावसाचं पाणी ठिकठिकाणी रस्त्यांवर साचलं आहे. मात्र या पाण्यामध्ये कुर्बानी दिलेल्या बकऱ्यांचं रक्त मिसळलं असल्याने रस्त्यांवर अक्षरक्ष: रक्ताचे पाट वाहत आहेत.
रक्ताचा हा महापूर पाहून किती बक-यांची कुर्बानी देण्यात आली असेल याचा अंदाज लावणंदेखील जमणार नाही. रक्त इतक्या प्रमाणात मिसळले होते की रस्तावरील पाणी लालभडक झालं होतं. रक्ताचे पाट वाहणे म्हणजे नेमकं काय असतं याची प्रचितीच संपुर्ण जगाला आली.
ईदच्या कुबार्नीनिमित्त बांगलादेशात ठिकाठिकाणी बकऱ्यांचा बळी दिला गेला. त्यावेळी पाऊसही सुरु झाल्यानं त्या पाण्यात प्राण्यांचं रक्त मिसळून ते अक्षरश रस्त्यांवर आलं. प्रशासनाने ५०४ जागा कुर्बानीसाठी निश्चित केल्या होत्या. सर्वच ठिकाणी एकाचवेळी कुर्बानी दिल्याने रक्त आणि पाणी एकत्र झाले. त्यामुळे रस्त्यावरून जणू रक्ताचे पाटच वाहत होते.
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले असून बक-यांची कुर्बीनी देण्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे.