चीन : तुम्ही इमारतीमधून पाण्याचे कारंजे उडताना पाहिले असतील. यालाच काहीजण आर्टिफिशिअल धबधबेही म्हणतात. पण चीनमध्ये एका इमारतीवर चक्क बर्फाचा धबधबा तयार झाला आहे. सध्या हा धबधबा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतोय.
पिपल्स डेलिने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या अन्शान विभागात हा प्रकार घडला आहे. एका इमारतीचं पाईप लिकेज झालं होता. त्यामुळे त्या इमारतीवरून हे पाणी खाली गळत होतं. पण त्या विभागात थंडीचं वातावरण असल्यानं ते पाणी तिथंच गोठलं आणि चक्क फ्रोजन वॉटरफॉल तयार झाला. बरं आश्चर्य अजून संपलेलं नाही. हा फ्रोजन वॉटरफॉल किती उंचीचा असू शकेल? तब्बल १० मीटर उंच हा फ्रोजन वॉटरफॉल असल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. खरं तर ऑक्टोबर महिन्यापासून या इमारतीला गळती लागली होती. मात्र तेव्हा कोणीच याकडे लक्ष दिलं नाही. मात्र जेव्हा इथं फ्रोजन वॉटरफॉल तयार झाला तेव्हा मात्र सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं.
आणखी वाचा - #SocialViral : बर्फाने गोठलेल्या नदीत स्केटिंग करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
पिपल्स डेलिने हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे खरंच हा फ्रोजन वॉटरफॉल दिसतोय की नाही हे पाहण्यासाठी तिथं बघ्यांची गर्दी झाली आहे. खरं तर या इमारतीत कोणीच राहत नाही. ही इमारत संपूर्णपणे रिकामी आहे. म्हणूनच ऑक्टोबरपासून या इमारतील गळती लागली होती तरीही कोणाला कळलं नाही. पण जेव्हा इमारतीवर फ्रोजन वॉटरफॉल तयार झाला तेव्हा मात्र सगळ्यांनीच या इमारतीकडे पाहायला सुरुवात केली. सध्या चीनमधील तापमान अत्यंत कमी झालं आहे, त्यामुळे तिथं थंडी वाढली आहे. त्याचाच प्रत्यय या फ्रोजन वॉटरफॉलच्या रुपात दिसतो. जिथं पाणी एवढं गोठलंय तिथं माणसं कोणत्या परिस्थितीत राहत असतील याचा विचारच न केलेला बरा.
आणखी वाचा - कॅनडात तापमान -४० अंश, उकळत्या पाण्याचं झालं बर्फात रुपांतर