ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 16 - रशियन मॉडेल व्हिक्टोरिया ऊर्फ विकी ओडिंटकोवा हिनं दुबईतील एका 1000 फूट उंच इमारतीवर लटकून फोटोशूट केलं आहे. विकीनं स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्ट्राग्रामवर शेअर केले आहेत. विकीचे इन्स्ट्राग्रामवर 30 लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. 22 वर्षीय विकीच्या या फोटोशूटचे व्हिडीओ इन्स्ट्राग्रामवर वा-यासारखे पसरले आहेत. त्यानंतर तिनं यावर प्रतिक्रियाही दिली आहे. ती म्हणाली, मला अजूनही विश्वास बसत नाही की, मी हे फोटोशूट पूर्ण केलं आहे. प्रत्येक वेळी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला घाम फुटतो. माझ्या अनेक फॉलोव्हर्सला हे धाडसी फोटोशूट आवडलेलं नाही. अनेकांनी मला तू बेपर्वा असल्याचं म्हटलं आहे. तू आयुष्याची अशी उपेक्षा कशी करू शकतेस, अशी कमेंटही एकानं टाकली आहे. तर दुस-यानं आम्ही तुझे पालक असतो तर तुला आणि तुझ्या दाढीवाल्या सहका-याला कानशिलात लगावली असती, असं म्हटलं आहे.या मॉडेलवर रशिया टुडेमधूनही टीका करण्यात आली आहे. दुबईत 2013मध्ये बांधण्यात आलेल्या 73 मजल्यांच्या सर्वात उंच केयान टॉवरमध्ये तिने फोटोशूट केलं आहे. यापूर्वीही रशियाच्याच दुस-या एका मॉडेलनं चीन गुआंगजौमध्या शांघाई टॉवरवर चढून असंच धाडसी फोटोशूट केलं होतं.
VIDEO- फोटोशूटसाठी ती लटकली 73 मजल्यांच्या इमारतीवर
By admin | Published: February 16, 2017 5:26 PM