मायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकताच ५० वा वर्धापन दिन साजरा केला. मायक्रोसॉफ्टने अमेरिकेत उत्साहात वर्धापन दिन साजरा केला. तरुणीने टेक कंपनीच्या तीन दिग्गजांना - सत्या नाडेला, स्टीव्ह बाल्मर आणि बिल गेट्स यांना गाझा हल्ला प्रकरणावरुन सुनावल्याचे दिसत आहे. गाझामधील "नरसंहाराला" तांत्रिक सहाय्य पुरवल्याबद्दल फटकारले आहे. या तरुणीने सुनावण्यास सुरुवात केली तेव्हा पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती. 'गाझाची भूमी रक्ताने माखली आहे आणि तुम्ही इकडे आनंदात उत्सव साजरा करत आहात',असं तरुणी बोलत असल्याचे दिसत आहे.
ट्रम्प-मस्क यांच्या धोरणांना लोक विटले: अमेरिकेत निघाले १२०० मोर्चे; भडका उडण्याची शक्यता
मायक्रोसॉफ्ट मुख्यालयामध्ये वर्धापन सुरू होता, आनंदाचा उत्सव अचानक शांततेत बदलला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर वानिया अग्रवाल यांनी सीईओ सत्या नाडेला, माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यावर स्टेजवर उभे राहून तीव्र निषेध व्यक्त केला. "लाज वाटली पाहिजे! मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञानामुळे ५०,००० पॅलेस्टिनी लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या रक्ताचा उत्सव साजरा करताय?', वानिया अग्रवाल असं बोलत असल्याचे दिसत आहे. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला.
व्यासपीठावर बिल गेट्स हसत राहिले
यावेळी व्यासपीठावर बसलेल्या बिल गेट्स यांनी वानियाच्या विधानावर हसत हसत आपले संभाषण सुरू ठेवले. जणू काही काहीही घडलेच नाही असं त्यांनी दाखवले. या घटनेनंतर लगेचच, वानिया यांनीही राजीनामा दिला. '११ एप्रिल हा त्यांचा मायक्रोसॉफ्टमधील शेवटचा दिवस आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी कंपनीचे वर्णन "डिजिटल शस्त्रास्त्रांचे उत्पादक" असे केले आहे. कंपनीच्या क्लाउड सेवा आणि एआय तंत्रज्ञान इस्रायलच्या "स्वयंचलित वर्णभेद आणि नरसंहार यंत्रणेचा" कणा बनले आहे, असंही त्यांनी म्हटले आहे.
वानिया यांच्या राजीनामा पत्रात काय आहे?
आपल्या राजीनामा पत्रात वानिया यांनी कपनीवर गंभीर आरोप केले आहेत."आपण कोणाला सक्षम बनवत आहोत? जुलमी? युद्ध गुन्हेगार? मायक्रोसॉफ्ट आता एक असे व्यासपीठ बनले आहे जे पाळत ठेवणे, वंशवाद आणि नरसंहाराला अधिकार देते. या कंपनीचा भाग असल्याने, आपण सर्वजण यात सहभागी आहोत," असंही यात म्हटले आहे.