गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थीती बिघडली आहे. नागरिकांना डाळ, पीठासाठी झगडावे लागत आहे, दिवसेंदिवस पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिघडत जात आहे. अनेक व्हिडिओंमध्ये लोक रेशनसाठी वाहनांच्या मागे धावतानाही दिसत आहेत.अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी म्हणत आहेत की, पाकिस्तानमध्ये माणुसकी संपली आहे.
पाकिस्तानी न्यूज चॅनल एक्सप्रेस न्यूजचा हा व्हिडीओ एका सरकारी कार्यालयाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एक किन्नर नृत्य करताना दिसत आहे. हे संपूर्ण प्रकरण पाकिस्तानमधील एका सरकारी कार्यालयाशी संबंधित आहे, या ठिकाणी एक किन्नर रेशन मागण्यासाठी गेला होता. पण, यावेळी त्या अधिकाऱ्यांनी रेशन देताना सर्व मर्यादा ओलंडल्या.त्या किन्नरांना रेशनच्या बदल्यात मनोरंजन करण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाळीव पोपटानं 'असं' काही केले, ज्यानं मालकाला २ महिने जेल अन् ७४ लाखांचं नुकसान झालं
मात्र, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर उपायुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिओ टीव्ही उर्दू या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ पाकिस्तानमधील गुजरांवाला येथील आहे. दुसरीकडे, सरकारी कर्मचाऱ्यांनी रेशनच्या बदल्यात नाचायला सांगितल्याचा आरोप किन्नरने अधिकाऱ्यांवर केला आहे. तुम्ही नाचून आमचे मनोरंजन कराल तेव्हाच रेशन मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दुसरीकडे सर्व आरोप फेटाळून लावत शासकीय कार्यालयाच्या प्रभारींनी हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये लोक त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या मागणीसाठी आंदोलन करत असल्याचे समोर आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वेगाने कमी होत असलेल्या नोकऱ्या आणि बेरोजगारीबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण पाकिस्तानमध्ये भाववाढीबाबत निदर्शने सुरू आहेत.