शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

Video : भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत बंदुकधारी तालिबानी; सभापतींच्या खुर्चीवरही बसले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 8:47 PM

Afghanistan Taliban Crisis : बंदुकधारी तालिबानींनी केला भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत प्रवेश. सभापतींच्या खुर्चींवरही बसले. 

ठळक मुद्देबंदुकधारी तालिबानींनी केला भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत प्रवेश. सभापतींच्या खुर्चींवरही बसले. 

रविवारी तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केला. अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे कब्जा केल्यानंतर देशाची संपूर्ण सूत्रं तालिबानच्या हाती जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. याचदरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीदेखील देश सोडण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानमध्ये काय परिस्थिती असू शकेल आणि तालिबान देश कशाप्रकारे चालवू शकतो याची झलक नुकतीच दिसली. संसद ही लोकशाहीसाठी पवित्र मानली जाते. परंतु राष्ट्राध्यक्ष भवनानंतर आता तालिबानींनी अफगाणिस्तानच्या संसदेवरही कब्जा केला. तालिबानींनी हत्यारांसह संसदेत प्रवेश केला. इतकंच नाही, तर सभापतींच्या खुर्चीवरही ते बसले. या संसदेची उभारणी भारतानं केली होती. तसंच २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ससंद भवनाचं उद्घाटनही करण्यात आलं होतं. 

वजाहत काझमी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये काही बंदुकधारी तालिबानी अफगाणिस्तानच्या संसदेच्या आत फिरताना दिसत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यापैकी एक बंदुकीसह सभापतींच्या खुर्चीवरही बसताना दिसत आहे. त्यांच्या समोर असलेल्या खुर्च्यांवरही काही तालिबानी बसल्याचं दिसून येत आहे.  अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहेत. 

गनी यांची भावूक पोस्ट"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं होतं.

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानParliamentसंसदIndiaभारतTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया