काबुल: अफगानिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) कहर केला असून जवळपास 65 टक्के भागावर ताबा मिळविला आहे. एवढेच नाही तर भारताने दहशतवाद्यांवर हवाई हल्ल्यासाठी दिलेले हेलिकॉप्टर तिथेच सोडून अफगान सैनिकांनी पळ काढला आहे. यामुळे हे हेलिकॉप्टर आता तालिबानच्या ताब्यात गेले आहे. (Taliban captured Kunduz airport with Afghanistan Air Force Mi-35 Hind attack helicopter.)
Afghanistan: तालिबानला घाबरून अफगानिस्तानच्या पायलटांचा नोकरीला रामराम; लष्कर हतबल
भारताने मैत्रत्वाच्या नात्याने एमआय-24 अटॅक हेलिकॉप्टर अफगानिस्तानला दिले होते. या हेलिकॉप्टरच्या आजुबाजुला तालिबानी दहशतवादी दिसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच हे हेलिकॉप्टर नादुरुस्त असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हे हेलिकॉप्टर उड्डान करू शकत नाही, असे सांगितले जात आहे. भारताने 2015 मध्ये चार आणि 2019मध्ये दोन अशी सहा हेलिकॉप्टर भेट दिली होती. ही रशियाच बनलेली हेलिकॉप्टर आहेत.
हे हेलिकॉप्टर जर ठीक केले तर तालिबानच्या हातात आणखी एक मोठी शक्ती सापडू शकते. हे हेलिकॉप्टर 2400 किलो वजन घेऊन उडू शकते. यामध्ये 23 एमएमची डबल बॅरल GSh-23V कॅनन लावलेली आहे, जी मिनिटाला 3,400 ते 3600 राऊंड फायर करू शकते. याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये अँटी टँक मिसाईल, रॉकेट, गन आणि एक्स्ट्रा फ्युअल टँकदेखील आहे. तालिबानने कुंदुज विमानतळ ताब्यात घेतला आहे. या ठिकाणी हे हेलिकॉप्टरही तैनात केलेले होते.
ISISच्या मार्गावर तालिबान! सेक्स गुलाम बनविण्यासाठी घराघरात घुसून मुलींना पळवू लागले, महिलांवर संकट
आठ पायलटांची हत्या गेल्या काही आठवड्यांत आठ पायलटांची हत्या झाली आहे. यामध्ये ब्लॅक हॉक पायलट हमीदुल्लाह अज़ीमी देखील आहेत. शनिवारी त्यांच्या कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. काबुलजवळ बॉम्ब फुटल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये अन्य पाच नागरिक जखमी झाले. गेल्या काही दिवसांत 19 पायलटांनी हवाई दलाची नोकरी सोडली आहे. एका पायलटाने सांगितले की, नोकरीवर येताना दररोज वेगवेगळ्या कार, वाहनांमधून जावे लागते. काही मित्र आहेत त्यांच्या कार मागाव्या लागतात. घरातूनही बाजारात जाता येत नाही. केस कापायलाही जाऊ शकत नाही. मी आता नोकरी सोडण्य़ाचा विचार करत आहे.