येत्या काही काळात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे युरोपवर युद्धाचे संकट निर्माण झाले आहे. असे असताना अमेरिकेच्या अजस्त्र युद्धनौका देखील तेथील समुद्रात पोहोचल्याने तणाव वाढला आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर टँक, तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत.
यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन युद्धाची तयारी करत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेने देखील काही दिवसांपूर्वी रशिया युक्रेनवर हल्ला करू शकतो असा युरोपीय देशांना इशारा दिला होता.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये वोरोनेझ शहराजवळ हजारो रशियन सैनिक जमल्याचे दिसत आहे. वोरोनेझ हे शहर युक्रेनच्या सीमेपासून 320 किमी दूर आहे. हेरगिरी करणारी संघटना जेन्सने सांगितले की, या शहरात मोठ्या प्रमाणावर टँक, तोफा आणि आर्मड व्हेईकल तैनात करण्यात आले आहेत. ही शस्त्रास्त्रे मॉस्कोवरून पाठविण्यात आली आहेत. यामध्ये टी-80 यू हा खतरनाक रणगाडा देखील आहे.
एका व्हिडीओमध्ये दिसतेय की, हे टँक आणि अन्य शस्त्रास्त्रे ट्रेनने नेली जात आहेत. काळ्या समुद्रात नाटोच्या देशांनी युद्धाभ्यास केला होता. यावर पुतीन यांनी नाराजी व्यक्त केली होती. गुप्तहेरीचे आरोप झाल्याने रशियाने आंतरराष्ट्रीय संघटनेतून माघार घेतली होती. यानंतर नाटोने हा युद्धाभ्यास केला होता. यावेळी नाटोने स्ट्रॅटेजिक एअरफोर्सचा वापर केल्याने पुतीन भडकले होते. युरोपमध्ये बेलारूस आणि पोलंडमध्येदेखील तणाव आहे. नाटोचा युद्धाभ्यास पूर्वनियोजित नव्हता असा आरोप पुतीन यांनी केला होता.
अमेरिका रशियन समुद्राजवळ दाखलपुतीन यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेने तातडीने युद्धनौकांची सहावी बटालियन काळ्या समुद्रात पाठविली आहे. अमेरिकेच्या अण्वस्त्रवाहू युद्धनौका, पाणबुड्या या समुद्रात गस्त घालत आहेत. यूएसएस माऊंट व्हिटनीदेखील समुद्रात आली आहे.