Corona China Updates: कोरोना महामारीची सुरुवात ज्या देशात झाली, त्या चीनमध्ये या महामारीने पुन्हा थैमान घातला आहे. चीनमधील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की, रुग्णांना ठेवण्यासाठी बेड नाहीत, मृतांना जाळण्यासाठी जागाही मिळेना. 24 तास अंत्यविधीसाठी वाट पाहावी लागत आहे. सध्या सोशल मीडियावर चीनमधील भीषण परिस्थिती दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
रुगणांच्या तपासणीदरम्यान डॉक्टर बेशुद्धचीनच्या चोंगकिंग शहरातील काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीदरम्यान एक डॉक्टर बेशुद्ध पडला. याशिवाय रुग्णालयात बेडची कमी असल्यामुळे रुग्णांना जमिनीवर झोपवले जात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण चिंतेत पडले आहेत. जगभरात कोरोना कमी झाला आहे, पण ही नवीन लाटेची चाहूल आहे का? असा प्रश्न लोकांना पडतोय.
व्हॅक्सीन न घेतलेल्यांना पुन्हा लागणचीनने देशव्यापी आंदोलनानंतर या महिन्यात झिरो कोव्हिड पॉलिसी हटवली होती. कडक नियम शिथिल करताच देशातील लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांनी कोरोना व्हॅक्सीन घेतलेली नाही. यात वृद्धांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या या लाटेसाठी हॉस्पिटल तयार नव्हते, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
सरकारी आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोरसरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना आटोक्यात आहे. चीनमध्ये बुधवारी कोरोनाचे नवीन 3101 प्रकरणांची नोंद झाली. यासोबतच चीनमध्ये रुग्णांची एकूण संख्या 386,276 झाली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, चीनमध्ये आता फक्त श्वसनासंबंधी आजार झाला, तरच कोरोना मृतांमध्ये नोंद होणार. या नियमानुसार, 20 डिसेंबर रोजी चीनमध्ये कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला आहे.